Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
प्रतिध्वनी सुस्पष्ट ऐकू येण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात?
संक्षेप में उत्तर
उत्तर
- सभोवतालचे तापमान आणि ध्वनीचा स्रोत व परावर्ततशील पृष्ठभाग यांमधील अंतर हे दोन घटक प्रतिध्वनीच्या निर्मितीत महत्त्वाचे असतात.
- 22°C तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 344 मीटर/सेकंद असतो. आपल्या मेंदूत ध्वनीचे सातत्य सुमारे 0.1 सेकंद असते. त्यामुळे ध्वनी अडथळ्यापर्यंत जाऊन पुन्हा श्रोत्यांच्या कानापर्यंत 0.1 सेकंदापेक्षा जास्त वेळाने पोहचला तरच आपल्याला तो स्वतंत्र ध्वनी म्हणून ऐकू येईल.
- अंतर = वेग × काल
= 344 मीटर/सेकंद × 0.1 सेकंद
= 34.4 मीटर
अशाप्रकारे, ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे अंतर व पुन्हा स्त्रोतापर्यंत पोहोचण्यासाठी ध्वनीने किमान 34.4 मीटर अंतर पार करणे आवश्यक आहे. - त्यामुळे सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतापासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर वरील अंतराच्या निम्मे म्हणजे 17.2 मीटर असावे लागते.
- वेगवेगळ्या तापमानाला ही अंतरे वेगवेगळी असतात.
shaalaa.com
प्रतिध्वनी
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: ध्वनीचा अभ्यास - स्वाध्याय [पृष्ठ १३७]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
प्रतिध्वनी म्हणजे काय?
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
विजयपूरच्या गोलघुमटाची रचना अभ्यासा व तेथे अनेक प्रतिध्वनी ऐकू येण्याची कारणमीमांसा करा.
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
प्रतिध्वनी निर्माण होऊ नये म्हणून वर्गखोलीची माेजमापे व रचना कशी असावी?
शास्त्रीय कारणे स्पष्ट करा.
वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही.