Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
सागरसंपत्तीमध्ये कशाकशाचा समावेश होतो? त्याचा आपल्याला काय उपयोग आहे?
संक्षेप में उत्तर
उत्तर
महासागर हे देखील महत्त्वाचे संसाधन आहेत, आणि याचे महत्त्व या गोष्टीवरून लक्षात येते की पृथ्वीच्या पृष्ठभागावर जमीनपेक्षा अधिक भाग महासागरांनी व्यापलेला आहे. महासागरांमधून मिळणारी संसाधने दोन प्रकारची असू शकतात:
सागरी खनिजसंपत्ती | सागरी जैविक साधनसंपत्ती |
थोरिअम - अणु ऊर्जानिर्मितीमध्ये वापर. | कोळंबी, सुरमई, पापलेट इत्यादी मासे - प्रथिने व जीवनसत्त्वे यांचे स्रोत असल्याने अन्न म्हणून प्रमुख उपयोग. |
मॅग्नेशिअम - कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये. | सुकट, बोंबील यांची भुकटी - कोंबड्यांचे खाद्य, उत्तम खत म्हणून शेतीसाठी वापर. |
पोटॅशिअम - साबण, काच, खतनिर्मिती मधील प्रमुख घटक. | शिंपले - औषधनिर्मिती, अलंकार, शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी बुरशी - प्रतिजैविकांची निर्मिती. |
सोडिअम - कापड, कागदनिर्मितीमध्ये वापर. | शार्क, कॉड मासे - अ, ड, इ जीवनसत्त्वयुक्त तेलनिर्मिती. |
सल्फेट - कृत्रिम रेशीम तयार करणे. | समुद्रकाकडी - कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषध म्हणून वापर. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?