हिंदी

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा. करदेय गोदामे - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

करदेय गोदामे

स्पष्ट कीजिए

उत्तर

करदेय गोदामे ही सरकारकडून परवानाकृत असून आयात मालाचा साठा सीमाशुल्क भरेपर्यंत आयातदाराकडून उपयोगात आणली जातात. ही गोदामे सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली काम करतात. सदर गोदामांमध्ये, गोदाम चालकाला एक करार (Bond) करून दयावा लागतो ज्यामध्ये गोदाम चालक आयातदार सीमाशुल्क भरल्याशिवाय सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या संमतीशिवाय मालाचा ताबा न देण्याबाबत कटिबद्ध असल्याचा निर्वाळा देतो. आयात माल कराराअंतर्गत (Bond) ठेवला जातो आणि संमतीशिवाय काढता येत नाहीत. जर आयातदार माल आयात झाल्यानंतर ताबडतोब सीमाशुल्क भरण्यास असमर्थ असेल अथवा सीमाशुल्क भरण्यास तयार नसेल तर तो माल बंधपत्र गोदामात ठेवू शकतो. आयातदार ज्याप्रमाणात सीमाशुल्क भरतो त्या प्रमाणात गोदामातून माल बाहेर काढू शकतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×