Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.
रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की मन कसे प्रसन्न होऊन जाते आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते त्या नाजूक टवटवीत गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार असते पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही दुसर्याला प्रफुल्लित करत सुवास देत ते हसत बागडत राहते ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना की मुलांनो आजचा दिवस आपला आहे या दिवशी आनंदाने हसा खेळा बागडा दुसऱ्यांना आनंद सुखसमाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे |
लघु उत्तरीय
उत्तर
रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले की, मन कसे प्रसन्न होऊन जाते, आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते, त्या नाजूक टवटवीत गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते, आज उमललेले फूल उद्या कोमेजून जाणार असते, पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही? दुसर्याला प्रफुल्लित करत सुवास देत ते हसत बागडत राहते, ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना की "मुलांनो, आजचा दिवस आपला आहे, या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा, दुसऱ्यांना आनंद, सुख समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे".
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?