हिंदी

खालील उतारा वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा: सर्व शिक्षा अभियान (SSA) हा भारत सरकारचा कार्यक्रम आहे. (1) सर्व शिक्षा अभियान उपयुक्त आहे असे तुम्हास वाटते काय? - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उतारा वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

सर्व शिक्षा अभियान (SSA) हा भारत सरकारचा कार्यक्रम आहे. यामध्ये ६ ते १४ या वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९३-९४ मध्ये पुढाकार घेतला. त्यानंतर २०००-२००१ मध्ये हा कार्यक्रम पूर्णत: कार्यरत झाला. या कार्यक्रमामध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार मानला गेला.

याबरोबरच १५ ऑगस्ट १९९५ मध्ये भारत सरकाने प्राथमिक शिक्षणासाठी पोषण आधार राष्ट्रीय कार्यक्रम (National Programme of Nutritional Support to Primary Education NP-NSPE) राबविला. तेव्हापासूनच शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी मोफत 'मध्यान्ह भोजन' ही संकल्पना अस्तित्वात आली, जी ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांसारख्या स्थानिक संस्थाकरवी राबविली जाते. मुलांना मध्यान्ह भोजन देणे सक्तीचे आहे. यामध्ये दररोज उत्तम आणि पोषक जेवण मुलांना देणे आवश्यक आहे असे मानले आहे. बऱ्याच संस्थांनी जेवण बनविणे व वेळेत शाळेत पोहचविणे हे काम हाती घेतले.

सार्वत्रिक शिक्षण आणि पोषण एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. गावांतील आणि नगरपालिकेच्या शाळांमधील मुले या भोजनाची वाट पाहत असतात. बर्‍याचदा हा आहारच त्यांच्यासाठी दिवसभराचा मुख्य आहार असतो.

  1. सर्व शिक्षा अभियान उपयुक्त आहे असे तुम्हास वाटते काय?
  2. "माध्यान्ह भोजन योजना विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीस चालना देते" समर्थन करा.
दीर्घउत्तर

उत्तर

  1. हो, सर्व शिक्षा अभियान (SSA) हा एक अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे कारण तो ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुनिश्चित करतो, ज्यामुळे शिक्षण हा मूलभूत अधिकार बनतो. यामुळे साक्षरतेचे प्रमाण लक्षणीयरीत्या सुधारले आहे, शाळेत प्रवेश वाढला आहे आणि वंचित मुलांना शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकास झाला आहे.
  2. मध्यान्ह भोजन योजना शाळेतील उपस्थिती वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते कारण ती विद्यार्थ्यांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना, मोफत आणि पौष्टिक जेवण प्रदान करते. अनेक मुलांसाठी, हे जेवण त्यांना दिवसातून मिळणारे एकमेव पौष्टिक अन्न आहे, जे पालकांना त्यांना नियमितपणे शाळेत पाठवण्यास प्रोत्साहित करते. यामुळे केवळ उपस्थिती आणि नोंदणी दर सुधारत नाहीत तर एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता देखील वाढते, ज्यामुळे एकूण शैक्षणिक विकासात हातभार लागतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×