हिंदी

खालील उतारा वाचून त्यावर चार प्रश्‍न असे तयार करा, की ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील: ही एका खेड्यातील गोष्ट आहे. काही विचारी गावकऱ्यांनी गावात एक शाळा बांधली. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उतारा वाचून त्यावर चार प्रश्‍न असे तयार करा, की ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील:

ही एका खेड्यातील गोष्ट आहे. काही विचारी गावकऱ्यांनी गावात एक शाळा बांधली. त्यांचे स्वप्न होते, गावातल्या मुलांनी शाळेत जावे, खूप शिकावे, शहाणे व्हावे.

मुले शाळेत आनंदाने आली पाहिजेत, म्हणून त्यांनी शाळेजवळ खेळासाठी मैदान तयार केले. खेळाचे सामान आणले. शिक्षकसुद्धा नेमले पण शाळेत मुलेच येईनात. फक्त पाच-सहाच मुले आली. बाकीची मुले रानात जात, गुरे राखत, आईवडिलांना शेतीत मदत करीत.

गाडगेबाबांनी सर्व गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. मग त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले. 

लघु उत्तरीय

उत्तर

  1. गावकऱ्यांनी गावात काय बांधले?
  2. शाळेत मुले आनंदाने येण्यासाठी गावकऱ्यांनी कोणती सोय केली?
  3. शाळेत नियमित येणाऱ्या मुलांची संख्या किती होती?
  4. गाडगेबाबांनी गावकऱ्यांना काय सांगितले?
shaalaa.com
गद्य आकलन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्न

स्वमत.

तुमची वर्गातील बसण्याची जागा बदलली तर- अशी कल्पना करून त्याबद्दल तुम्हांला काय वाटेल ते लिहा.


खालील उतारा वाचा व त्याच्या आशयावर प्रश्न तयार करा.

रोजचा दिवस आपल्यापुढे नवीन आव्हाने घेऊन येतो. ती आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य अंगी बाणायचे असेल तर स्वतःला घडवले पाहिजे. स्वतःला घडवायचे ते कशासाठी, तर जीवनात यशस्वी होण्यासाठी. यश म्हणजे नेमके काय? आपण जे उद्‌दिष्ट ठरवलेले असते, ते प्राप्त करणे म्हणजे यश. आपल्या प्रत्येकाच्या अंगी काही कौशल्ये असतात, गुणवत्ता असते. त्या कौशल्याची, गुणवत्तेची सर्वोत्तम पातळी गाठणे म्हणजेच यश.

यश मिळवणे जितके महत्त्वाचे असते, त्यापेक्षा मिळवलेले यश टिकवणे अधिक महत्त्वाचे असते. स्वकष्टाने निर्माण केलेले स्थान टिकवण्यासाठी आपल्याला रोज नवे नवे शिकावे लागते. हे शिकत असताना चुका होणे काहीच गैर नाही; पण एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करणे मात्र आपल्या प्रगतीतील धोंड आहे. तुमची खरी स्पर्धा इतरांशी नसते. ती स्वतःशीच असते. इतरांशी तुलना जरूर करावी; पण ती स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी, दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी नव्हे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×