हिंदी

खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्‍नांची उत्तरे लिहा: सर्वसाधारणपणे बाजार ही अशी विशिष्ट जागा आहे की जेथे ग्राहक व विक्रेते आपल्या वस्तूची देवाण-घेवाण करतात. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

सर्वसाधारणपणे बाजार ही अशी विशिष्ट जागा आहे की जेथे ग्राहक व विक्रेते आपल्या वस्तूची देवाण-घेवाण करतात. पण अर्थशास्त्रामध्ये बाजार ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली जाते. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार 
केला तर बाजार हे एक ठिकाण नसून ती एक यंत्रणा आहे की जिच्याद्वारे ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे 
आपल्या वस्तूची देवाण-घेवाण करतात. 

बाजाराचे वर्गीकरण स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार केले जाते. स्पर्धेनुसारच्या बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा हे दोन प्रकार आहेत. पूर्ण स्पर्धा ही बाजाराची काल्यनिक संकल्पना आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात अपूर्ण स्पर्धेचे अनेक प्रकार आढळून येतात. जसे मक्तेदारी, द्वयाधिकार, अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा.

सद्यस्थितीत मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही प्रत्यक्ष व्यवहारात मोठ्या प्रमाणात आढळून येते. यामध्ये पूर्णस्पर्धा व मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे आढळून येतात. उत्पादन खर्च व विक्री खर्च यातील भिन्रता हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे प्रमुख लक्षण आहे. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय. यामध्ये जाहिरात, फलक, खिडकी प्रदर्शन इत्यादी चा समावेश विक्री खर्चात येतो.

  1. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या लिहा.
  2. बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते ते लिहा.
  3. विक्री खर्चाविषयी आपले स्वमत लिहा.
संक्षेप में उत्तर

उत्तर

  1. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार 
    केला तर बाजार हे एक ठिकाण नसून ती एक यंत्रणा आहे की जिच्याद्वारे ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे 
    आपल्या वस्तूची देवाण-घेवाण करतात. 
  2. बाजाराचे वर्गीकरण स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार केले जाते. स्पर्धेनुसारच्या बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा हे दोन प्रकार आहेत. पूर्ण स्पर्धा ही बाजाराची काल्यनिक संकल्पना आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात अपूर्ण स्पर्धेचे अनेक प्रकार आढळून येतात. जसे मक्तेदारी, द्वयाधिकार, अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा.
  3. माझ्या मते, विक्री खर्च हे कंपनीच्या उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या धोरणाचा आणि मागणी वाढवण्यासाठीचा एक महत्त्वाचा भाग आहे. जाहिरात आणि प्रचारात्मक क्रियाकल्पांचा समावेश असलेले हे खर्च, स्पर्धात्मक बाजारपेठेत संभाव्य ग्राहकांना माहिती देणे आणि एका उत्पादनाला दुसऱ्यावर पसंती देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे यासाठी आवश्यक आहेत.
shaalaa.com
बाजाराचे वर्गीकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×