Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
आपण कोणतही कार्य करताना 'मी' सोडून सर्वांनी हे करावं अशी भूमिका असते. पण आमचं नेमकं चुकतं कुठे? इथेच तर! कारण 'मी' स्वतःला कधी गृहीत न धरल्याने माझ्यातील अधिकारवाणीचा अहंभाव जागा होतो. त्यामुळे केवळ हे काम माझे नाहीच ते इतरांनी करायचे आहे अशीच माझ्या मनाची भूमिका होते. पण या भूमिकेत जे कोणी असतात त्यांनी एक ओळखायला हवे की स्वत:कडे ध्येय नसताना इतरांकडून कोणतीही कृती करून घ्यायची तेव्हा आमची अवस्था “तुझं आहे. तुजपाशी, परि तू जागा चुकलाशी” अशीच होणार. आजपर्यंत डॉ. कलाम सर यांनी नेमकं हेच जाणलेलं होतं. आपण तसे एका राष्ट्राचे राष्ट्रपती आहोत, म्हणून केवळ अधिकारवाणीने जगत राहिलो तर, तर काहीच साध्य होणार नाही. संदर्भ - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चिरंतन प्रेरणा लेखक - श्री. के. आर. पाटील प्रकाशक - ज्ञानसंवर्थन प्रकाशन, कोल्हापूर |
उत्तर
आपण कोणतेही कार्य करताना इतरांनीच करावे अशी भूमिका घेतो, पण स्वतःला कधीही त्या जबाबदारीत समाविष्ट करत नाही. यामुळे आपल्या मनात अहंभाव निर्माण होतो आणि आपण स्वतःहून काही करण्याची इच्छा बाळगत नाही. जर स्वतःचे ध्येयच स्पष्ट नसेल, तर इतरांना प्रेरित करणेही कठीण होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी हेच समजून घेतले होते. त्यांनी केवळ अधिकाराने नव्हे, तर कृतीतून नेतृत्व करत देशासाठी कार्य केले.