Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा.
पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण ३०° ते ६०° उत्तर व ३०° ते ५५° दक्षिण अक्षवृत्तादरम्यान झालेले दिसते. या व्यवसायावर हवामानाचा प्रभाव दिसून येतो. उत्तर गोलार्धामध्ये या व्यवसायाचा विकास जास्त झालेला आढळतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालन विस्तीर्ण गवताळ कुरणे, अत्याधुनिक तंत्र, बाजारपेठ आणि जमिनीच्या मोठ्या भागावर उपलब्धता यांनी प्रभावित झालेले आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये यांचा विकास व्यापारी दृष्टीने झाला. दक्षिण अमेरिका व उत्तर अमेरिकेतील पशुपालन उच्च तंत्रज्ञानावर आधारित असून तेथे या व्यवसायाचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. घनदाट वने, रोगट हवामान, निकृष्ट चारा असणाऱ्या विषुववृत्तीय प्रदेशात या व्यवसायाचा विकास फारसा झालेला नाही. |
- पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान झालेले आढळते?
- पशुपालन व्यवसायाचा सर्वात जास्त विकास कोणत्या गोलार्धात झालेला आहे?
- ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालन व्यवसाय कोणत्या घटकामुळे प्रभावित झालेले आहे?
- जगातील पशुपालन व्यवसायाचे यांत्रिकीकरण झालेले खंड कोणते?
लघु उत्तरीय
उत्तर
- पशुपालन व्यवसायाचे जागतिक वितरण ३०° ते ६०° उत्तर व ३०° ते ५५° दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान झालेले आढळते.
- पशुपालन व्यवसायाचा सर्वात जास्त विकास उत्तर गोलार्धात झालेला आहे.
- ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण व उत्तर अमेरिका खंडातील पशुपालन व्यवसाय विस्तीर्ण गवताळ कुरणे, अत्याधुनिक तंत्र, बाजारपेठ आणि जमिनीच्या मोठ्या भागावर उपलब्धता यांनी प्रभावित झालेले आहे.
- जगात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत पशुपालनाचे सर्वाधिक यांत्रिकीकरण आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?