Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
करेतर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत.
विकल्प
सहमत
असहमत
उत्तर
मी दिलेल्या विधानाशी सहमत आहे.
स्पष्टीकरण:
प्रशासन, व्यापारी उपक्रम, देणग्या आणि अनुदाने इत्यादींद्वारे मिळालेल्या सार्वजनिक उत्पन्नाला करेतर उत्पन्न असे म्हणतात.
- शुल्क (fees): कर कोणत्याही मोबदल्याविना सक्तीने द्यावा लागतो, तर शुल्क हे शासनाने पुरवलेल्या सेवे बद्दल दिले जाते. उदा.., शैक्षणिक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादी.
- सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती (Prices): आधुनिक शासन आपल्या नागरीकांना विविध वस्तू व सेवांची विक्री करते. अशा वस्तू व सेवांचा लोकांनी शासनाला दिलेला मोबदला म्हणजे किंमत होय. उदा.,रेल्वे भाडे, टपाल सेवा इत्यादी.
- विशेष अधिभार: शासनाने विशिष्ट भागातील रहिवाशांनादिलेल्या विशेष सुविधांबद्दल नागरीकांनी दिलेला. मोबदला म्हणजे विशेष अधिभार होय. उदा., ज्या विशिष्टभागातील रहिवाशांना स्थानिक स्वराज्य संस्था रस्ते, ऊर्जा, पाणीपुरवठा इत्यादी विशेष सुविधा पुरवल्याबद्दल कर लागू करू शकतात.
- दंड व दंडात्मक रकमा: देशातील कायदे व नियम मोडणाऱ्या लोकांवर शासन दंड आकारते. हा दंड आकारण्याचे उद्दिष्ट उत्पन्न कमविणे नसून लोकांना शासनाचे नियम तोडण्यापासून परावृत्त करणे, हे आहे. उदा., वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल होणारा दंड.
- भेटी, अनुदाने व देणग्या: शासनाला आपल्या नागरिकांकडून व इतरांकडून भेटीद्वारे उत्पन्न मिळू शकते. त्या व्यतिरिक्त शासनाला विदेशी शासन व संस्थांकडून सर्वसाधारण किंवा विशिष्ट हेतूसाठी अनुदाने मिळू शकतात. भारतासारख्या विकसनशील देशात विदेशी साहाय्य हा विकासखर्चाचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत झाला आहे. हा उत्पन्नाचा स्त्रोत अनिश्चित स्वरूपाचा आहे.
- विशेष कर: ज्या वस्तूंचा उपभोग नागरिकांच्या आरोग्य आणि हितासाठी बाधक ठरतो अशा वस्तूंवर हा कर लागू केला जातो. दंडाप्रमाणेच या कराचे उद्दिष्ट उत्पन्न मिळविण्याचे नसून लोकांनी अहितकारक वस्तूंच्या उपभोगापासून परावृत्त व्हावे हे असते. उदा., मद्य, अफू आणि इतर अमली पदार्थांवरील कर इत्यादी.
- कर्ज: शासनाला लोकांकडून ठेवी, कर्जरोखे इत्यादी माध्यमांतून कर्ज घेता येते. याशिवाय विदेशी शासन आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक इत्यादी संस्थांतून कर्ज मिळवू शकते. आधुनिक काळात कर्ज, हा शासनाचा अधिकाधिक उत्पन्नाचा स्त्रोत बनत आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कराची महत्त्वाची वैशिष्ट्ये
(अ) कर हा शासनाला स्वेच्छेने द्यावयाचा असतो.
(ब) ज्या नागरिकांवर कर लागू होतो त्यांनी तो देणे कायदेशीरित्या बंधनकारक आहे.
(क) कर उत्पन्न, मालमत्ता किंवा वस्तू व सेवांवर लागू केला जातो.
(ड) कराच्या मोबदल्यात करदात्याला शासनाकडून भेट व प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार असतो.
करेतर उत्पन्नाचे स्रोत
(अ) विशेष अधिभार
(ब) दंड व दंडात्मक रकमा
(क) वस्तू व सेवा कर
(ड) भेटी, अनुदाने, देणग्या
उत्पन्न कर : प्रत्यक्ष कर :: वस्तू व सेवा कर : ______
वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा कर.
विसंगत शब्द ओळखा.
करेतर उत्पन्न:
फरक स्पष्ट करा.
प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर