Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर अंदाजे 60/70 शब्दांत लिहा.
तुमच्या शाळेत 27 फेब्रुवारीला साजरा झालेल्या 'मराठी भाषादिन' या कार्यक्रमाचा अहवाल लिहा.
उत्तर
चेतना कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय
नागपूर
वार्षिक स्नेहसंमेलन 2024 - 2025
अहवाल
शनिवार, दिनांक 27 फेब्रुवारी रोजी आमच्या शाळेत सकाळी 10 वाजता "मराठी भाषादिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते, मा. श्री. गणेश दिघे यांनी भूषवले होते.
कार्यक्रमाचा आरंभ 'तू बुद्धी दे, तू तेज दे' या प्रार्थनेने करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेतील मोहिनी काळे या विद्यार्थिनीच्या सुमधुर गीताने सर्वांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रा. कुमार दाढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समारंभात सादर होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली. प्रा. दीप्ती राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.
प्रमुख पाहुण्यांनी मराठी भाषेचा संवर्धन व अभिमान यावर जोर देत विद्यार्थ्यांना मराठीचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी कविता, नाटके, भाषणे सादर केली. शेवटी सर्वांनी मिळून मराठीचा अभिमान जपण्याची शपथ घेतली व कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.
प्रा. दीप्ती राणे
अर्थशास्त्र विभागप्रमुख
दि. ……… सचिव अध्यक्ष