Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर संक्षिप्त टिप लिहा.
राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडथळे
टिप्पणी लिखिए
उत्तर
राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळे पुढीलप्रमाणे:
- जातीयवाद: जातीयवाद म्हणजे देशाऐवजी जातीप्रती निष्ठा बाळगणे होय. जातीसंबंधांची मुळे घट्ट रोवलेली असल्याने लोक देशाऐवजी जातीच्या संदर्भात प्रथमतः विचार करतात. यामुळे लोकांना समाजसेवा, शिक्षण, वैद्यक आणि कल्याण योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जातीच्या सदस्यांचे संरक्षण करणे शक्य आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
- संप्रदायवाद: संप्रदायवाद म्हणजे धर्म आधारित राष्ट्रप्रेम होय. म्हणजेच, राष्ट्रापेक्षा धर्माप्रती आत्यंतिक निष्ठा बाळगणे. त्यातून अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्या निर्माण होतात.
- प्रादेशिकतावाद: प्रादेशिकतावाद म्हणजे देशाऐवजी प्रदेशाप्रती असलेली आत्यंतिक निष्ठा होय. हे राज्यांतर्गत शत्रुत्व केवळ आर्थिक किंवा सामाजिक (उदाहरणार्थ, निधी किंवा कल्याणकारी योजना इत्यादीसाठी) असेल तर त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. मात्र, या शत्रुत्वाला राजकीय रंग आला तर मात्र ते घातक ठरते.
- भाषावाद: राज्यांची भाषावार निर्मिती आणि राज्यातील भाषिक अल्पसंख्याक यामध्ये भाषावादाचे मूळ सापडते. प्रत्येक राज्यात एक प्रमुख प्रादेशिक भाषा आहे. एक भाषा बोलणारे लोक सहसा त्यांचे भाषिक वर्चस्व इतरांवर लादतात, जे संघर्षाचा आधार बनतात.
- आर्थिक विषमता: राज्यातील लोकांचा आर्थिक दर्जा विविध घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, संसाधनांची उपलब्धता, व्यवस्थापन आणि नियोजन, जमिनीची सुपीकता, संपत्तीचे वितरण इत्यादी. याबाबत सर्व राज्यांची परिस्थिती समान नसल्याने आर्थिक असंतुलन निर्माण होते. राज्यातील संपत्तीच्या असमान वितरणामुळे ताण आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. अनेकदा ही संपत्ती थोडक्या लोकांच्या हाती एकवटलेली असते. खाजगी क्षेत्रातून निर्माण होणारा नफा सधन वर्गाच्या हाती एकवटतो आणि सर्वसामान्य त्यापासून वंचित राहतात. अशाप्रकारे, एकाधिकार निर्माण झाल्याने खुल्या स्पर्धेत बाधा येते.
shaalaa.com
राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?