हिंदी

खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. 1. जाहिरात लेखन: -

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.

1. जाहिरात लेखन:

पुढील विषयावर जाहिरात तयार करा. शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा.

2. बातमीलेखन:
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:

3. कथालेखन:
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.

आंतरशालेय क्रीडास्पर्धा – धावण्याची स्पर्धा – शाळेतर्फे वरदचा सहभाग – वरद उत्तम धावपटू – सराव – उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा – प्रत्यक्ष स्पर्धा – चुरशीची स्पर्धा – अचानक तनयचा पाय मुरगUणे – स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे – स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक –

संक्षेप में उत्तर

उत्तर

1.

शारदा विद्यालय, ठाणे  आयोजित 

इंद्रधनू चित्रकला वग

चला नवे रंग भरूयात...
(उन्हाळी सुट्टीत खास विद्यार्थ्यांसाठी)

चित्रकला क्लासची वैशिष्ट्य

  • इयत्तेनुसार वर्गाची सोय
  •  माफक फी 
  • विविध उपक्रम आणि ऑसाइनमेंटस्
  • एलिमेंटरी तसेच इंटरमिजिएट परीक्षांची पूर्वतयारी करून घेतली जाईल.
प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना चित्रकलेचे साहित्य शाळेतर्फे पुरवले जाईल.

 १ मे पासून सुरू
सोमवार ते शनिवार क्लास सुरू राहतील.
वेळ - सकाळी १० ते १२ - इयत्ता ८वी, ९वी, १०वी
दुपारी १२ ते २ - इयता ५वी, ६वी, ७वा

संपर्क: श्री. जांभळे सर
पत्ता - शारदा विद्यालय,
राम - मारुती रोड, घंटाळी, ठाणे ४०००६०१ 

 

2. 

जनमानस
सानेगुरुजी  विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

१४ जानेवारी २०२०
सोलापूर

काल दिbनांक  १३ जानेवारी रोजी सानेगुरुजी विद्यालय, सोलापूर आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडला. या क्रीडा महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. रोहित बर्वे हे होते, तर सुप्रसिद्ध धावपटू मा. सौ. अपर्णा भोसले या महोत्सवात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

सानेगुरुजी विद्यालयातील इयत्ता ५ वी ते इयत्ता ९ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी या क्रीडा महोत्सवात भाग घेतला होता. सकाळी ८ वाजता क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली. कबड्डी, खो-खो, लंगडी, गोळाफेक, धावण्याची शर्यत यांसारख्या पारंपरिक खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे बास्केटबॉल, फुटबॉल असे पाश्चिमात्य खेळाच्या स्पर्धाही झाल्या. खेळासोबत शिस्त व लयबद्ध पद्धतीने कवायत प्रकार, मल्लखांब प्रकार तसेच लेझीम नृत्य यांसारखे क्रीडा साहित्यावर आधारित नृत्यप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले.

त्यानंतर क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष मा. श्री. रोहित बर्वे आणि प्रमुख पाहुण्या मा. सौ. अपर्णा भोसले यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. 'मानवाच्या आयुष्यातील खेळाचे महत्त्व' या विषयावर मा. सौ. अपर्णा भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रगीताने क्रीडा-महोत्सवाची सांगता करण्यात आली.

3.

माणुसकीची शिकवण

त्यादिवशी वरद घरी आला तो उड्या मारतच. त्यांच्या जिल्ह्यामध्ये लवकरच आंतरशालेय क्रीडा स्पर्धा होणार होती. क्रीडास्पर्धेमध्ये धावण्याची स्पर्धा होती . वरद हा एक उत्तम धावपटू असल्यामुळे शाळेतफेर् वरदने या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असं मुख्याध्यापकांचं म्हणणं होतं. वरदने दुसर्या दिवशीपासूनच स्पर्धेचा सराव सुरू केला.

वरदच्या घराजवळ राहणारा तनय हादेखील उत्तम धावपटू होता आणि तोही त्याच्या शाळेमधून आंतरशालेय क्रीडास्पर्धेमध्ये भाग घेणार होता. आपण तनयला नक्कीच हरवू आणि पहिला क्रमांक मिळवू असा वरदला आत्मविश्वास होता आणि त्यासा"ळी तो भरपूर मेहनतही करत होता. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाली. वरद, तनय आणि आणखी दोन मुलांमध्ये अतिशय चुरशीची स्पर्धा होती. वरद जीव तोडून धावत होता आणि अचानक तनयचा पाय मुरगळ. तनय मटकन खाली बसला. वरदच्या हे लक्षात आलं. मागचापुढचा विचार न करता त्याने स्पर्धा सोडून तनयकडे धाव घेतली. त्याला उठायला मदत केली आणि हळूहळू आधार देऊन धावपट्टीच्या बाजूला असलेल्या एका बाकावर बसवलं. तनयचे शिक्षक आणि क्रीडास्पर्धेचे आयोजवक हे सगळ बघत होते. तनयचे शिक्षकही धावत मदतीला आले.

तनय आणि वरद दोघेही स्पर्धेतून बाद झाले आणि दुसरा एक मुलगा स्पर्धा जिंकाला. आपण जिंकू शकलो नाही या विचारांनी वरदच्या डोळयामध्ये पाणी आलं; पण तेवढ्यात अचानक त्याच्या नावाचा पुकारा झाला. स्पर्धेचे आयोजवक बोलत होते, ’या धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस एका धावपटूने मिळवले असले, तरी या संपूर्ण क्रीडास्पर्धेमध्ये अव्वल "रलेला ए खेळाडू म्हणून आज मी वरदचं नाव घोषित करतो. स्पर्धेपेक्षा देखील माणुसकी महत्वाची असते ही एका अतिशय महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला वरदने शिकवली. आयोजकचे शब्द संपताच टाळचा कडकडाट झाला. स्पर्धा हरल्याचं दु:ख वरद विसरला. स्पर्धा जिंकण्याच्या आनंदापेक्षा दुसर्याची मदत करण्यातला आनंद मोठा आहे हे आज त्यालाही उमगलं होतं. तात्पर्य: माणुसवकीचा विचार करून एकमेकाना मदत करणे हा सर्वांत मोठा गुण आहे.

shaalaa.com
जाहिरात लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×