Advertisements
Advertisements
प्रश्न
खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे, तर त्या कारची करपात्र किंमत, त्यावरील CGST व SGST चे गणन करा.
उत्तर
समजा, जीएसटीची रक्कम ₹ x आहे.
रिमोट कंट्रोल कारची जीएसटीसह एकूण किंमत ₹ 1770
∴ रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत = ₹ (1770 - x)
आता, GST = करपात्र किमतीच्या 18%
∴ x = `18/100 xx (1770 - x)`
∴ 100x = 18(1770 - x)
∴ 100x = 18 × 1770 - 18x
∴ 100x + 18x = 18 × 1770
∴ 118x = 18 × 1770
∴ x = `(18 xx 1770)/118` = 18 × 15 = 270
∴ GST = ₹ 270
∴ रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत = ₹ (1770 - x)
= ₹ (1770 - 270)
= ₹ 1500
CGST = SGST = `"GST"/2`
∴ CGST = SGST = `270/2` = ₹ 135
∴ रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत ₹ 1500 व त्यावरील CGST व SGST प्रत्येकी ₹ 135 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
'टीपटॉप इलेक्ट्रॉनिक्स' ने एका कंपनीला दीड टनाचा व करासह 51200 रुपये किमतीचा एअरकंडिशनर पुरवला. एअरकंडिशनरवरील CGST चा दर 14% आकारला, तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा.
- SGST चा दर
- एसीवरील GST चा दर
- एसीची करपात्र किंमत
- GST ची एकूण रक्कम
- CGST ची रक्कम
- SGST ची रक्कम
प्रसादने 'महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स' मधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. जीएसटीचा दर 28% आहे, तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयांस मिळाले? कर बीजकात सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये असेल ते काढा.
एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून _____ आकारला जातो.
25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापाऱ्याने 10% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 28% उएऊ आकारला, तर एकूण बिल किती रुपयांचे असेल? त्यात CGST व SGST शीर्षकाखाली किती रक्कम असायला हवी?
दिलेल्या माहितीवरून रिकाम्या जागा भरून सेवाबीजक पूर्ण करा.
सेवा पुरवल्याचा टॅक्स इन्व्हॉइस (नमुना) | ||||||||
आहार सोनेरी, खेड शिवापूर, पुणे | Invoice no. 58 | |||||||
Mob no. 7588580000, email - [email protected] | ||||||||
GSTIN: 27AAAAA5555B1ZA | Invoice Date: 25 Feb., 2020 | |||||||
SAC | Food items |
Qty | Rate (in ₹) |
Taxable amount |
CGST | SGST | ||
9963 | Coffee | 1 | 20 | 20.00 | 2.5% | ₹ 0.50 | 2.5% | `square` |
9963 | Masala Tea | 1 | 10 | 10.00 | `square` | ₹ 0.25 | 2.5% | `square` |
9963 | Masala Dosa | 2 | 60 | `square` | 2.5% | `square` | 2.5% | ₹ 3.00 |
Total | 150.00 | `square` | ₹ 3.75 | |||||
Grand Total | = ₹ 157.50 |
खेळण्यातील एका रिमोट कन्ट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 2360 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
कृती:
कारची विक्री किंमत (जीएसटीसह) = 2360 रुपये
जीएसटी दर = 18%
समजा कारची करपात्र किंमत x रुपये आहे.
∴ जीएसटी = `18/100 xx x`
खेळण्यातील कारची विक्री किंमत = करपात्र किंमत + `square` ....... सूत्र
∴ 2360 = `square + square/100 xx x`
∴ 2360 = `square/100 xx x`
∴ 2360 x 100 = 118x
∴ `x = (2360 xx 100)/square`
∴ कारची करपात्र किंमत `square` रुपये आहे.