Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हांला हलकंहलकं, पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपणं नाहीशी व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया नाहीशा व्हायला हव्यात. राग, द्वेष विरघळायला हवेत. काहींना एखादं बक्षीस मिळालं, तरी त्या ‘अमक्या’ला चार बक्षिसं मिळाली याचं वैषम्य वाटतं किंवा मग ‘त्या लेकाला एकही बक्षीस मिळालं नाही’, याचाच अधिक आनंद होतो. स्वत:ला काही मिळणं, स्वत: आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं, ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. तुलना आली, की आनंद संपलाच. खरा आनंद दुसऱ्याच्या दु:खावर कधीच पोसला जात नसतो. खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नव्हे, तर चित्ताला शुद्ध करत असतो. माणूस खऱ्या आनंदात असतो, तेव्हा त्याला सगळं जग छान, सुंदर वाटत असतं. आपल्यासारखंच सगळ्यांनी मजेत, आनंदात असावं, असंच त्याच्या मनात येत असतं. स्वत:च्या मनात तो मावेनासा झाल्यानं सर्वांना वाटावा, असं वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते. अनेकदा आयुष्यात असं काही घडतं, की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो, माणसं दु:खातून बाहेर येत नाहीत. त्याचं कारण ते दु:खाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील, तर आतलं दु:ख बाहेर जाणार कसं? बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दु:ख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल, तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं खुल्यादिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी ‘कधी पडायचा पाऊस’ म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाइलाज असतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. कृत्रिम नव्हे ... नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल, म्हणून वाट पाहत बसलं, तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो. कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं, की मग मात्र ‘नाही आनंदा तोटा’ अशी अवस्था होते. |
(१)
(i) (1)
(ii) (1)
आभाळाकडे डोळे लावून बघतो तो
एकदा आनंद कसा घ्यायचा ते तंत्र जमलं कि
खरा आनंद ओळखण्याची एक
(२) खऱ्या आनंदामुळे कोणकोणत्या गोष्टी घडतात? (2)
(३) स्वमत अभिव्यक्ति (4)
‘खरा आनंद दुसऱ्याच्या दु:खावर कधीच पोसला जात नसतो’ या विधानाचा अर्थ तुमच्या भाषेत लिहा.
किंवा
‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’ या विधानाचा तुमच्या जीवनात कसा उपयोग कराल? उदाहरणासह लिहा.
उत्तर
(१)
(i)
(ii) शेतकरी
मग मात्र ‘नाही आनंदा तोटा’ अशी अवस्था होते.
(२) खऱ्या आनंदामुळे पुढील गोष्टी घडतात-
- खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर पोसला जात नाही.
- खरा आनंद हा केवळ मनालाच हलके करते नाही तर तो चित्रालाही शुद्ध करतो.
- खऱ्या आनंदामुळे सगळं जग छान, सुंदर वाटत असते.
- खऱ्या आनंदामुळे आपल्यासारखं सगळ्यांनी मजेत, आनंदात असावं असेही मनात येते.
(३) ‘आयुष्य... आनंदाचा उत्सव’ या पाठाचे लेखक शिवराज गोर्ले असून, ‘मजेत जगावं कसं’ या त्यांच्या पुस्तकातून हा पाठ्यांश घटक घेतला असून मानवी जीवनात आनंदाला महत्त्वाचे स्थान असले तरी बरेचदा आनंद म्हणजे काय, तो कसा मिळवावा हे उमगत नाही. खरे म्हणजे आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो; त्यासाठी आनंदाचे भान त्या व्यक्तीला असावे लागते तरच त्यास आनंदाने, मजेत जगता येते हे येथे लेखकाने हलक्या-फुलक्या शैलीत उलगडले आहे.
जीवनामध्ये त्या व्यक्तीला त्यांच्या कार्यासाठी एखादे बक्षीस मिळाले तरी दुसऱ्याला चार बक्षिसे मिळाली आहेत याचे वैषम्य वाटते अथवा त्या एकाला एकही बक्षीस मिळाले नाही याचाच अधिक आनंद होतो. स्वत:ला काही मिळणं आणि स्वत: आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणे हे ज्यांना महत्त्वाचे वाटते, अशी माणसे आपल्या जीवनात कधीच आनंदी होत नसतात कारण एकमेकांशी तुलना केली की आनंद हा संपतोच कारण खरा आनंद हा दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोसला जात नाही. खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नाही तर चित्तालाही शुद्ध करत असतो. मनापासून आनंदी असलेल्या माणसास संपूर्ण जग मजेत, आनंदी दिसते त्यास स्वत:च्या मनातील आनंद इतरांसाठीही वाटावा अथवा हा आनंद फक्त दाखवण्याची वा प्रदर्शन करण्याची गरज त्यास वाटत नाही.
किंवा
शिवराज गोर्ले लिखित ‘आयुष्य.... आनंदाचा उत्सव’ हा पाठ्यांश घटक त्यांच्याच ‘मजेत जगावं कसं’ या पुस्तकातून घेतला आहे. प्रत्येक व्यक्तीला आनंद हा हवा असतो परंतु तो घ्यायचा कसा हे त्यांना समजत नाही. खरा आनंद हा बाहेर नसून माणसाच्या अंतरंगात असतो. त्यासाठी आनंदाचे भान हे जागे असणे गरजेचे असते. हेच या पाठातूत लेखकने आपल्या हलक्या-फुलक्या शैलीत उलगडले आहे. आनंद नेमका कशात असतो? तो कसा अनुभवायचा? छोटया-छोट्या गोप्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो त्याचबरोबर आनंदी राहण्याची सवयं कशी लावून घ्यावी यासाठी विविध उदाहरणांतून लेखकाने मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
मनावरचा ताण, दडपण नाहीसे होणे म्हणजे माणसाला वाटणारा आनंद, मनातील ईर्ष्या, असूया मनातील नष्ट होणे, राग द्वेष विरघळून जाणे होय. मात्र कार्यकर्तृत्वामुळे एखाद्या व्यक्तीला बक्षीस मिळते. त्यावेळी दुसऱ्याला चार बक्षिसे मिळाली तर वैषम्य वाटणे वा एखाद्याला एक ही बक्षीस मिळाले नाही म्हणून आनंद होणे चुकीचे असते. कारण स्वत:ला आनंदी पाहण्यापेक्षा दुसऱ्यास आनंदी न पाहणे हे ज्यांना महत्त्वाचे वाटते ते आयुष्यात कधीच आनंद मिळवू शकत नाही. आणि हा आनंदही तात्पुरता असतो तो दीर्घकाळ कधीच टिकत नाही. म्हणूनच जर आपण आनंदी असलो तर आपणास संपूर्ण जग आनंदी असावे उत्साही असावे असे वाटते. स्वतःचा आनंद मनात मावेनासा होतो त्यावेळी आपण हा आनंद सर्वांना वाटण्याचा प्रयत्न करते. उदाहरण- कॉम्पिटेटिव्ड एक्झाममध्ये मिळालेले यश अथवा खेळाच्या स्पर्धेत राज्यपातळीवर मिळालेले यश हे आपले एकट्याचे नसून त्या यशाचे मानकरी खेळ शिकवणारे शिक्षक व खेळात सहभागी झालेले खेळाडू यांचे असल्याचे स्वीकारणे हाच खरा आनंद असतो. परंतु आपल्या आयुष्यात एखादी दुःखद घटना घडली की आपण आनंदासाठी मनाची दारे कायमची बंद करतो. दुःखातून बाहेर पडण्याचाही प्रयत्न करत नाही तसेच इतरांशीही संवाद साधत नाही मात्र इतरांशी संवाद साधला असता मन एकदम हलके होते. मनातील दु:ख, चिंता, टेंशन यांची गर्दी न करता ती कमी कशी होतील याचाही विचार केला तर आपल्या मनात आनंदाला जागा मोकळी होईल. थोडक्यात आपण आपल्या मनावर कसलेही दुःख, दडपण, ताण न घेता खुल्या दिलानं आनंदाचे स्वागत केले तर आनंद हा आनंदाकडे येतो आणि सर्व जग आनंदी वाटते.