हिंदी

कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

 

 

संक्षेप में उत्तर
सारिणी

उत्तर

कंदील: फार दिवसांनी भेट झाली आपली! कशी आहेस तू?
विजेरी: मी बरी आहे. पण तू इथे काय करतोस? तुझी आता गरज उरली नाही.
कंदील:  असे का म्हणतेस? तुझे नि माझे एकच तर कार्य आहे. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणे.
विजेरी:  ते ठीक आहे. पण तू अगदी जुनापुराणा झालास. तुला पेटवताना किती कष्ट पडतात. मी पाहा, एक बटन दाबले की लांबवर झोत पडतो.
कंदील:  हो. पण तुझा प्रकाश डोळ्यांना त्रास देतो. मी अगदी मंद तेवतो!
विजेरी:  तू तर उगाचच मिणमिणतोस. माझ्या प्रकाशाचा झगमगाट तर बघ. कशी लखलखते मी!
कंदील:  अग, तुला सेल लागतात पेटवायला. ते गेले की तुझा खेळ समाप्त! मी तर अखंड तेवत राहतो.
विजेरी:  तुलाही तेल लागतंच की! तेल घाला, वात ठेवा. ती भिजवा. तेव्हा कुठे तू पेटतोस!
कंदील:  माझ्याकडे तेल आहे. खरंच! तेलाला स्नेह म्हणतात. फार प्राचीन काळापासून माझा व माणसांचा स्नेहबंध आहे.
विजेरी:  हो. पण काळ बदलला. आता तुझी गरज नाही.
कंदील:  असे म्हणू नकोस! प्रकाश देणे आपले व्रत आहे. आपल्या दोघांचेही कार्य एकच आहे. आपल्या कार्याचा विसर पडू देता कामा नये! 
shaalaa.com
उपयोजित लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: वस्तू - संवादलेखन [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 6 वस्तू
संवादलेखन | Q (१) | पृष्ठ २३

संबंधित प्रश्न

घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा.


खालील अपूर्ण कथा वाचा. तुमच्या विचार व कल्पनेने कथा पूर्ण करा.

२६ जानेवारी, भारताचा गणतंत्र दिन. अर्णव स्वच्छ शालेय गणवेशात तयार होऊन शाळेत गेला. माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला. विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीत सादर केले. अध्यक्षांच्या प्रेरणादायी भाषणानंतर अर्णवचे देशभक्तीचा संदेश देणारे व देशभक्ताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे भाषण झाले. वृक्षारोपण, खाऊवाटप झाल्यानंतर मुले घरी जायला निघाली.

अर्णवदेखील आपली तीनचाकी सायकल घेऊन निघाला. सावकाशपणे हुतात्मा चौकापर्यंत पोहोचला. लाल दिव्याचा संकेत मिळताच जागेवरच थांबला. चौकात खूप गर्दी होती. अनेक छोटी मुलं हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन पालकांच्या वाहनांवर बसली होती. हिरवा दिवा दिसताच थांबलेली गर्दी पुढे सरकली. अर्णवनेही हाताने चाकाला वेग दिला. एवढ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेणारं असं.....

  • तुम्ही लिहिलेल्या कथेला योग्य शीर्षक द्या व तात्पर्य लिहा.  
  • तुम्ही कथा तयार करताना व लिहिताना कोण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या, त्यांची यादी करा.

खालील जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरुपात पुनर्लेखन करा.


खाली दिलेल्या बातमीच्या मथळ्यावरून आकर्षक जाहिरात तयार करा.

‘पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील.’


¤ स्वच्छता अभियान कार्यक्रम ¤

२ ऑक्टोबर आष्टी जि. चंद्रपूर येथील शारदा विद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला. या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जयंत करोडे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले.

इयत्ता आठवी ते दहावी साठी ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धाआयोजित केली होती. अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात ‘स्वच्छता अभियान’ राबवले. प्रमुख पाहुण्यांनी ‘माझी शरीर स्वच्छता आणि आहार’ या विषयावर उत्तम उद्बोधन केले. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षीय भाषणानंतर श्री. गावंडे सरांनी आभारप्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.

वरील वृत्तांत वाचा व त्यासाठीची कृती तयार करा.


प्रसंगलेखन-

खालील बातमी वाचा.

वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता. त्या भावपूर्ण प्रसंगाचे लेखन करा.


आत्मकथन-

खालील दिलेला महामार्गावरील सूचनाफलक तुमच्याशी बोलतो आहे, अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मकथन लिहा.

♦ वाहने हळू चालवा.
♦ पुढे एक किलोमीटरचा घाट आहे.
♦ गरज पडेल तेव्हा कर्णभोंगा वाजवा.
♦ गतिरोधकावर वाहनाची गती कमी करा.
♦ वाहन चालवतांना भ्रमणध्वनी बंद ठेवा.
♦ लक्षात ठेवा - ‘नाही पेक्षा उशीर बरा’.


खालील मुद्द्यांच्या आधारे लेखन करा.


गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या तुमच्या मित्राची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

कृती करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

शब्दजाल पूर्ण करा.


खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.

वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?


खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा.

शब्द - छत्री, रेनकोट, पाऊस


शब्दसमूह, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर करून उतारा तयार करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×