Advertisements
Advertisements
प्रश्न
- कणसाचा जन्म ताटातून होतो.
- आम्ही पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट तयार केले.
या दोन वाक्यांत 'ताट' शब्दाचे दोन अर्थ आलेले आहेत. याप्रमाणे काही शब्दांचे दोन किंवा अधिक अर्थ असतात. असे जास्तीत जास्त शब्द शोधा. त्यांचा भिन्न भिन्न अर्थ स्पष्ट करणारी वाक्ये लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
- किरण: अर्थ - उन्हाची तिरीप, व्यक्तीचे नाव
- हिवाळ्यामध्ये सकाळी आमच्या.घरात छान सूर्याचे किरण येतात.
- तिच्या बहिणीचे नाव किरण आहे.
- उत्तर: अर्थ - प्रश्नाचे उत्तर, एका दिशेचे नाव
- तो माझ्या प्रश्नाचे उत्तर देत आहे.
- तुझं घर उत्तर दिशेला आहे का?
- ऋण: अर्थ:- वजाबाकीचे चिन्ह, कर्ज, उपकार
- किरणचे उज्वलावर खूप ऋण आहे.
- पाच मधून तीन ऋण केल्यास दोन राहतात.
- घट: अर्थ - झीज, मडके
- आईने जास्त पायदळ प्रवास केल्याने चप्पलची खूप घट झाली आहे.
- आमच्याकडे नवरात्रीमध्ये पूजेला घट वापरतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?