हिंदी

कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान का महत्त्वाचे असते? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान का महत्त्वाचे असते?

संक्षेप में उत्तर

उत्तर

माणसांना अथवा वस्तूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याच्या क्रियेला वाहतूक म्हणतात. सुरुवातीला माणूस स्वतः वस्तू उचलून वाहून न्यायचा. मात्र नवनवीन शोधांमुळे आज वाहतुकीची अत्याधुनिक, जलद आणि विश्वव्यापी साधने उपलब्ध झाली आहेत. आता वाहतूक हा मानवाचा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे.
मानवाच्या आजपर्यंतच्या इतिहासात वाहतूक व्यवस्थेच्या विकासाने अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. इतकेच नव्हे, तर सध्याच्या जगात देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास होणे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बनला आहे.
देशाच्या विकासात वाहतूक व्यवस्थेचे स्थान पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल :
(१) वस्तूंची उपलब्धता: एखाद्या प्रदेशात मुबलक साधनसंपत्ती आणि दुसऱ्या प्रदेशात तिची कमतरता हा विरोधाभास वाहतुकीमुळे दूर करता येतो. वाहतुकीमुळे वस्तूंची, साधनसंपत्तीची देवाणघेवाण करता येते. त्यामुळे मानव आपल्या गरजा सहजपणे भागवू शकतो. वाहतुकीमुळे वस्तूंची स्थळउपयोगिता व काळउपयोगिता वाढते आणि वस्तूंच्या किम ती कमी होतात.
(२) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार: एखाद्या प्रदेशात विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते, तर दुसऱ्या प्रदेशात त्या वस्तूंना मागणी असते. उत्पादन आणि मागणी केंद्रांना जोडण्याचे महत्त्वाचे कार्य वाहतुकीमुळे होते. थोडक्यात वाहतुकीमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो.
(३) उद्योगांची स्थाननिश्चिती: विविध उदयोगधंदयांना विविध प्रकारचा कच्चा माल, मजूर, यंत्रसामग्री, पाणी, इंधन, साधने यांची गरज असते. या सर्व गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात. मात्र या वस्तूंच्या गुणदोषांचा विचार करून उदयोगधंदयांचे स्थान वाहतुकीमुळे ठरवता येते. वाहतुकीमुळे उदयोगांनी तयार केलेला पक्का माल बाजारपेठेत ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतो.
(४) आर्थिक विकास: वाहतूक साधनांमुळे उदयोगांचा विकास होतो. स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार वाढतो. वाहतूक साधनांमुळेच कुशल मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री मिळते. थोडक्यात, देशाच्या सर्वांगीण विकासास वाहतुकीच्या साधनांमुळे चालना मिळते.
(५) शहरीकरण: वाहतुकीच्या साधनांमुळे जशी मालाची वाहतूक होते, तशी लोकांची स्थलांतरे होतात. लोकसंख्येचे अधिकाधिक केंद्रिकरण होते आणि त्यामुळे शहरांची वाढ आणि विकास होतो. जेवढी वाहतूक साधने विकसित तेवढा शहरीकरणाचा वेगही जास्त असतो. 
(६) पर्यटन व्यवसायाचा विकास: पर्यटन हा अत्यंत वेगाने वाढणारा मानवाचा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. संपूर्ण पर्यटन क्षेत्राचा विकास हा पूर्णतः वाहतूक साधनांमुळे आणि वाहतुकीच्या मार्गामुळे होतो.
(७) सामाजिक आदान-प्रदान: वाहतुकीच्या साधनांमुळे विविध विचार करणारे, विविध सांस्कृतिक व राजकीय पार्श्वभूमी असलेल्या मानवी समूहांचे लोक एकत्र येतात. त्यांच्यामध्ये विचारांची देवाण घेवाण होते आणि त्यामुळे सामाजिक अभिसरणाची क्रिया घडून येते. याचा प्रभाव शेवटी प्रदेशाच्या विकासावरही होतो.
(८) आपत्ती निवारणातील महत्त्व: युद्ध, दुष्काळ, पूर, भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी यांसारख्या मानवी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जलद वाहतूक मार्ग हे जीवनरेषेचे कार्य करतात. यामुळेच जीवित व आर्थिक नुकसानीचे प्रमाण कमी करता येते. त्याशिवाय वाचलेल्या लोकांचे स्थलांतर आणि योग्य पुनर्वसनही वाहतुकीमुळे शक्य होते.
थोडक्यात वाहतूक हे आता मानवी जीवनाचे अविभाज्य अंग बनले असून ; मानवी जीवन, मानवी व्यवसाय, मानवी संस्कृती तसेच प्रदेशाचा आर्थिक विकास यांमध्ये वाहतुकीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

shaalaa.com
व्यापारातील वाहतुकीचे महत्त्व
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: तृतीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ६५]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
अध्याय 6 तृतीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ६. ३) | पृष्ठ ६५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×