Advertisements
Advertisements
प्रश्न
कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा.
उत्तर
कथेमध्ये घटना असतात. या घटनांना एखादया सूत्रानुसार गुंफण्यासाठी कथानक असते. कथानकात पात्रे असतात. वास्तवातल्या माणसांसारखीच ही पात्रे चित्रित केलेली असतात. वास्तवातली माणसे जशी एकमेकांशी वागतात, तशीच पात्रेसुद्धा एकमेकांशी वागतात. ती एकमेकांशी भांडतात. एकमेकांना मदत करतात. एकमेकांवर प्रेम करतात. राग, लोभ, प्रेम, असूया, दया, सहानुभूती वगैरे भावभावना वास्तवातल्या माणसांमध्ये असतात. तशाच भावभावना पात्रांमध्येही असतात. पात्रांच्या एकमेकांशी वागण्यातून घटना निर्माण होतात. तसेच, कथेमध्ये स्थळ, काळ, वेळ यांचेही चित्रण केलेले असते. कथेच्या विषयानुसार वातावरण असते. पात्रांच्या परस्परांशी वागण्यातून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. या सर्व घटकांनी युक्त अशी रचना घेऊन कथा निर्माण होते. तिला समर्पक शीर्षक मिळाले की कथा परिपूर्ण होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
कथेची वैशिष्ट्ये: _________
कथेचे कोणतेही दोन घटक सोदाहरण स्पष्ट करा.
कथेची कोणतीही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते,' हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा.
कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्ये लिहा.
कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
'कथा आजही लोकप्रिय आहे,' या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
प्रभावी कथाकथन करण्यासाठी कथाकथन करणाऱ्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
पुढील उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा.
नाट्यमयता/संघर्ष: | कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो; पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. |
संवाद: | कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितिजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. |
भाषाशैली: |
कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाववैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. वरील घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे तीन टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्परविरोधी भूमिकांतून तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगांतून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळेसौंदर्य प्राप्त होते. कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करते. |
(१) (2)
(i)
(ii)
(२) कथेतील ‘नाटयात्मता’ या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे स्पष्ट करा. (2)
जोड्या लावा:
अ | ब |
(क) इरावती कर्वे | (i) गर्भरेशीम |
(ख) दुर्गा भागवत | (ii) मर्ढेकरांची कविता |
(ग) इंदिरा संत | (iii) पैस |
(घ) विजया राजाध्यक्ष | (iv) युगान्त |
(v) सौंदर्यानुभव |
दिलेल्या उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
कथा वाचताना अनेकदा ‘आता पुढे काय होणार’ अशी उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते. कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंफण अशा कौशल्याने केलेली असते, की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. यादृष्टीने पाठ्यपुस्तकातील ‘शोध’ ही कथा एकदा वाचा. त्या कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट या सर्वांमुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते, हे तुमच्या लक्षात येईल. कथा एककेंद्री असते. कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. |
(१) (२)
- फ्लॅशबॅक लेखनशैली म्हणजे
- कथा लहान असणे कारण
कथा वाचकांची उत्कंठा वाढवणे
(२) ‘कथा मानवी जीवनाचा वेध घेते’ या विधानाचा समजलेला अर्थ तुमच्या भाषेत लिहा. (२)
जोड्या लावा:
अ गट | ब गट |
(क) शंकर पाटील | (i) एका मुंगीचे महाभारत |
(ख) योगीराज वाघमारे | (ii) बेगड |
(ग) जयंत नारळीकर | (iii) वळीव |
(घ) गंगाधर गाडगीळ | (iv) यक्षाची देणगी |
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर-नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदनशैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्षबिंदूही (क्लायमॅक्स) असतो कथेत! अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षक ही असते. 'एक विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे एखादया विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा.' अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखादया कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरणनिर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची ही असू शकते. |
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा: (२)
(य) प्रारंभी कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहा.
(र) कथेची व्याख्या लिहा.
(२) कथा लेखनासाठीचे आवश्यक असणारे चार मुद्दे लिहा. (२)