Advertisements
Advertisements
प्रश्न
लिखित साधनांच्या जतनासाठी उपयुक्त प्रशिक्षणाबद्दल सविस्तर माहिती द्या?
उत्तर
ज्या साधनांद्वारे लिखित स्वरूपात इतिहासाची माहिती मिळते त्यांना लिखित साधने म्हणतात.
इतिहासाच्या लिखित साधनांच्या जतन व संवर्धनाकरता उपयुक्त प्रशिक्षण पुढीलप्रमाणे -
१. ब्रह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या लिपीचे आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान.
२. इतिहासकालीन समाजरचना व परंपरा, साहित्य व संस्कृती, राजसत्ता, शासनव्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान.
३. विविध चित्रशैली, शिल्पकलाशैली आणि त्यांच्या विकासाच्या क्रमांचे ज्ञान.
४. कागदाचे प्रकार, शाई आणि रंगांचे ज्ञान.
५. कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयी माहिती.
६. दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यांसाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे व रसायने यांची माहिती.
७. संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान.
८. संशोधनपर लेखन