Advertisements
Advertisements
प्रश्न
माहिती संप्रेषणाची विविध साधने कोणती आहेत? विज्ञानाच्या संदर्भात त्यांचा वापर कसा केला जातो?
संक्षेप में उत्तर
उत्तर
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने:
रेडिओ, मोबाईल, संगणक, दूरदर्शन, आंतरजाल, ई-मेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इत्यादी माहिती संप्रेषणासाठी वापरली जाणारी उपकरणे आहेत.
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा विज्ञानातील वापर:
- मोबाईल: विज्ञानाशी संबंधित व्याख्यानांचे ध्वनिमुद्रण व चित्रीकरण करून विद्यार्थ्यांना उजळणीसाठी दिली जाते. याद्वारे विज्ञानाशी संबंधित माहिती मिळू शकते.
- दूरदर्शन: विज्ञानाशी संबंधित शैक्षणिक धड्यांचे पुनरावलोकन केले जाऊ शकते. नॅशनल जिओग्राफिक, ॲनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी चॅनल यांसारख्या वाहिन्यांवर विज्ञानाशी संबंधित कार्यक्रमांचा अभ्यास करून आवश्यक ती माहिती मिळवता येते.
- संगणक: विज्ञानाशी संबंधित माहिती संगणकात संग्रहित केली जाते आणि ती माहिती चे सादरीकरण करणे, आलेख निर्मिती करणे यासाठी वापरली जाते.
- आंतरजाल: संगणक आणि आंतरजाल वापरून विज्ञानाशी संबंधित माहिती मिळवता येते. विविध संकेतस्थळांना भेट देऊन आवश्यक माहिती व चित्रे कॉपी करता येतात. वैज्ञानिक प्रयोग आणि निर्मितीचीही येथे तपासणी करता येते.
shaalaa.com
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?