Advertisements
Advertisements
प्रश्न
'माझी आवडती कला' या विषयावर दहा ओळींत माहिती लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
कला हा एक संस्कृत शब्द आहे. मानवी जीवनात कलेचे अनन्यसाधारण महत्व आहे. इतिहास व आपल्या संस्कृतीत कलेचा संबंध हा सौंदर्य, सुंदरता आणि आनंदाशी आहे. आपल्या मनातील भावनांना सौंदर्यासोबत दृश्य रूपात व्यक्त करणे म्हणजेच कला होय. कलेचे अनेक प्रकार आहेत. जसे, चित्र, नृत्य, मूर्ती, वाद्य, साहित्य, लेखन, संगीत, काव्य इत्यादी कलेचे काही प्रमुख प्रकार आहेत. परंतु माझी आवडती कला ही साहित्य कला आहे. साहित्य कला समाजाला सशक्त बनवण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावते. असे म्हटले जाते की साहित्य हे समाजाचे आरसे आहे. साहित्य समाजात संवेदना जागृत करते. प्राचीन व आधुनिक काळातील गोष्टी, महाकाव्य आणि पवित्र ग्रंथ साहित्य म्हणूनच ओळखले जातात. साहित्याच्या मदतीनेच इतिहास आणि ऐतिहासिक घटनांना समजले जाऊ शकते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?