Advertisements
Advertisements
प्रश्न
मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूचे कार्य काय आहे?
उत्तर
(१) बुबुळाच्या मध्यभागी डोळ्याची बाहुली म्हणजे बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते. प्रकाश जास्त असल्यास बाहुलीचे आकुंचन होऊन प्रकाशाचे नियंत्रण होते. तसेच प्रकाश कमी असल्यास बाहुली रुंदावून जास्त प्रकाश डोळ्यात शिरतो. अशा प्रकारे प्रकाशाचे प्रमाण नियमित होते.
(२) मानवी डोळ्यातील भिंगाला जोडलेले स्नायू डोळ्यातील लवचीक भिंगाची वक्रताग्य प्रमाणात बदलतात. त्यामुळे भिंगाचे नाभीय अंतर बदलून दृष्टिपटलावर वस्तूची वास्तव प्रतिमा तयार होते.
मानवी डोळ्यातील भिंगाला जोडलेले स्नायू शिथिल असताना भिंग कमी फुगीर असते आणि दूरच्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा दृष्टिपटलावर मिळते. त्यामुळे ती वस्तू स्पष्ट दिसते.
दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होणे (प्रारूप आकृती)
जवळची वस्तू बघायची असल्यास डोळ्यातील भिंगाला जोडलेले स्नायू आकुंचन होऊन नेत्रभिंगाची वक्रता वाढवतात. त्यामुळे भिंग फुगीर होऊन त्याचे नाभीय अंतर कमी होते. त्यामुळे जवळच्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा दृष्टिपटलावर मिळते, त्यामुळे ती वस्तू स्पष्ट दिसते.
जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होणे (प्रारूप आकृती)
APPEARS IN
संबंधित प्रश्न
निरोगी मानवी डोळ्यांसाठी निकट बिंदू डोळ्यापासून _____ अंतरावर असतो.
डोळ्यांतील स्नायू शिथिल असताना निरोगी डोळ्यांकरता डोळ्यांच्या भिंगाचे नाभीय अंतर सुमारे _____ एवढे असते.
नाव लिहा.
नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात.
नावे लिहा.
मानवी डोळ्यांतील प्रकाश संवेदनशील पेशींनी बनलेला पडदा.
अनंत अंतरावरील वस्तूची प्रतिमा बहिर्गोल भिंगाद्वारे वास्तव व सुलट स्वरूपात मिळते.
निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू अनंत अंतरावर असतो.
व्याख्या लिहा.
दृष्टीचे लघुतम अंतर
व्याख्या लिहा.
दृष्टीचे अधिकतम अंतर
व्याख्या लिहा.
समायोजन शक्ती
साध्या सुक्ष्मदर्शीमध्ये ______ भिंगाचा वापर करतात.