Advertisements
Advertisements
प्रश्न
(मातीची सावली) पाठाच्या आधारे फरसूचे खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा.
उत्तर
छंद: फरसू हा निरागस आयुष्य जगणारा एक साधारण शेतकरी होता. छोट्या छोट्या गोष्टींत तो आनंद शोधत असे. तो घराच्या दारात बसून, चिंचेच्या झाडाची भिरभिरणारी पाने पाहायचा आणि झाडावर चढणाऱ्या खारींचे खेळ बघणे हा त्याचा आवडता छंद होता. रात्री चिंचेच्या झाडाखाली बसून, चंद्रप्रकाशात खूप उशिरापर्यंत आबूबरोबर गप्पा मारत बसणे त्याला खूप आवडायचे.
मेहनत: फरसू नेहमी मेहनतीत पुढे असायचा. तो जमिनीवर पडलेली चिंचेची पानन् पान गोळा करायचा आणि तो ती पाने शेतात पसरवायचा. भाताचे पीक झाल्यावर, त्याच्या जागी वांगे, दुधी अशा भाज्यांचे पीक घेत असे. फरसू व त्याची पत्नी अत्यंत मेहनतीने काम करत असत. शेवटपर्यंत मातीची सेवा करायची आणि झाडापानांना उघड्यावर फेकायचे नाही. हे त्यांचे ध्येय होते.
दु:ख: फरसूचे जीवनातील दु:ख कमी नव्हते. त्याचा मुलाने बिल्डरच्या नादाला लागून जमीन, घर, झाडे असे सगळे काही विकून टाकले. फरसूसाठी हे सर्व त्याच्या आयुष्याचे सार होते. परंतु, त्याच्या भावनांची त्याच्या मुलाला आणि सुनेला कोणतीही किंमत नव्हती. त्याची सून तर त्याचा तिरस्कार करायची. यामुळे फरसूला त्याचे घर फक्त एक खानावळप्रमाणे वाटू लागले होते.
माणूसपण: फरसूने एक जबाबदार माणूस म्हणून त्याची सर्व कर्तव्ये योग्यरित्या पूर्ण केली होती. त्याने त्याच्या तिन्ही मुलींची लग्ने करून त्यांना सुखरूपपणे सासरी पाठवले. मुलाला चांगले शिक्षण दिले. परंतु, शहरीकरणाची वावटळ त्याचा आनंदमय संसार नष्ट करीत होती. एकंदरीत फरसूची कहाणी मनाला व्याकूळ करून टाकते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.
मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा.
खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.
आईच्या पदरासारखी चिंचेची सावली.
खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा.
वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने.
खालील तक्ता पूर्ण करा.
घटना | परिणाम/प्रतिक्रिया |
(१) फरसू खुर्चीवर पाय वर घेऊन बसतो. | |
(२) मनूला फरसूने शिकवले. | |
(३) वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खिळा लागला. | |
(४) मनूने जमीन विकायला काढली. |
ओघतक्ता तयार करा.
ओघतक्ता तयार करा.
खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
‘‘त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी.’’
खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.
‘‘आमचा जलम या मातीत गेला म्हणून थोडं वायीट वाटते.’’
खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.
फरसूने आपल्या वडिलांचे ऋण व्यक्त केले -
खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.
फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला -
खालील अर्थाचे वाक्य पाठातून शोधून लिहा.
फरसूचे झाडांबाबतचे प्रेम -
‘मातीशी नाळ तुटली, की माणूसपण तरी कसं राहणार?’ या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा.
‘मातीची सावली’ या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा.