Advertisements
Advertisements
प्रश्न
‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.
‘बालसाहित्यिका-गिरिजा कीर’ या पाठाच्या आधारे ‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम लक्षण आहे’ या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर
आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो. तो एका गृहस्थाचे पाकीट मारतो.
पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्य स्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशांमुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो. या विचाराने तो व्याकूळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचातरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणाच होय, ते त्याला जाणवते. आपली जशी आई आहे, तशीच दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा आई असते. त्या व्यक्तीलासुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो; दुसऱ्याच्या मनाचा विचारच करीत नाही, हे मधूच्या लक्षात येते. यातून त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते.
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
आकृती पूर्ण करा.
साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष लिहा.
टिपा लिहा.
‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद.
साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे, तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्हांला मधूशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल, ते तुमच्या शब्दांत लिहा.
टिपा लिहा. (३)
बालनाटिका
टिपा लिहा. (३)
साहित्यकृतींचा आस्वाद घेताना विचारात घ्यायचे मुद्दे.
टिपा लिहा. (३)
गिरिजाबाईंच्या चरित्रातून मिळणारा संदेश.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
'यडबंबू ढब्बू' मधील ढब्बू तुम्हांला कसा वाटतो, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा.