Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा: (४)
मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडादिवस' म्हणून साजरा केला जातो. त्यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हणतात. १९५६ मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना 'पद्मभूषण' या सन्मानाने विभूषित करण्यात आले. |
- १९३६ मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते? (१)
- भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो? (१)
- हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा. (२)
लघु उत्तरीय
उत्तर
- १९३६ मध्ये मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकी संघाचे कर्णधार होते.
- २९ ऑगस्ट, ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो.
- हॉकी हा एक रोमांचक आणि वेगवान खेळ आहे ज्यासाठी कौशल्य, सांघिक कार्य आणि रणनीती आवश्यक आहे. हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि त्याचा समृद्ध इतिहास आहे, ज्यामध्ये मेजर ध्यानचंद सारख्या दिग्गजांनी त्याच्या वैभवात योगदान दिले आहे. या खेळाने देशाला अनेक गौरव मिळवून दिले आहेत आणि तरुण खेळाडूंना प्रेरणा देत आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?