हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

मॅक्झिम गॉर्की यांच्याविषयी आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मॅक्झिम गॉर्की यांच्याविषयी आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा.

लघु उत्तरीय

उत्तर

२८ मार्च १८६८ रोजी निझ्नीमध्ये जन्मलेला अलेक्साय मॅक्झीमोविच पेश्कॉव्ह ऊर्फ 'मॅक्झिम गॉर्की' हा सुप्रसिद्ध रशियन कथाकार आणि कादंबरीकार! त्याचं लहानपण विपन्नावस्थेत गेलं होतं. त्या संघर्षमय काळात त्याने जे जीवन बघितलं, त्यावर आधारलेल्या त्याच्या भटक्या आणि विमुक्तांच्या कथा गाजल्या. त्या कटू अनुभवांमुळेच त्याने लेखन करताना आपल्या नावापुढे 'गॉर्की (कटुता)' हे टोपण आडनाव घेतलं होतं! 

वयाच्या २७व्या वर्षी त्याची 'चेल्काश' ही कथा आणि त्यापाठोपाठ चार वर्षांनी आलेली 'ट्वेंटी सिक्स मेन अँड ए गर्ल' या कथा प्रचंड गाजल्या आणि त्याला टॉल्स्टॉय आणि चेकॉव्हखालोखाल लोकप्रियता लाभली. पुढे त्याच्या 'थ्री ऑफ देम', 'दी लाइफ ऑफ मेत्वेय कोझेम्याकीन', 'ओकुरोव्ह सिटी' आणि 'मदर' यांसारख्या कादंबर्‍या आल्या; मात्र त्याला जगभर प्रसिद्धी लाभली ती त्याच्या 'दी लोवर डेप्थ्स (ऊर्फ 'ए नाइट्स लॉजिंग)' या नाटकामुळे! 

माय चाइल्डहूड, दी ओल्ड वूमन इझेर्गील, मेकर त्शुद्र, अनटाइमली थॉट्स, डॅन्कोज बर्निंग हार्ट, दी स्पाय असं त्याचं इतरही लेखन प्रसिद्ध आहे. त्याला नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळालं होतं. १८ जून १९३६ रोजी त्याचा मृत्यू झाला.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.2: अण्णा भाऊंची भेट - शोध घेऊया. [पृष्ठ ७]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 1.2 अण्णा भाऊंची भेट
शोध घेऊया. | Q १. | पृष्ठ ७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×