Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. का ते लिहा. (2)
- पोरांना बसने प्रवास करणे आवडत नाही, कारण ______.
- आपल्याला झाडं लावावी लागतील, कारण ______.
‘‘मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत’’, स्नेहल गहिवरून म्हणाली. अभिषेक भारावून म्हणाला, ‘‘माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम!’’ ‘‘खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट’’, अभिषेकचे बाबा म्हणाले. रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले. ‘‘पाह्यलंत, किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखामावशींनी’’, सुमित म्हणाला. ‘‘पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र, आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्या करता आपल्याला झाडं लावावी लागतील... या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील’’, सुमित भरभरून बोलत होता. ‘‘हो ना, नाही तर आपण तसेच धावत राहू. मळलेल्या पायांची माणसं बनून!’’ पावडेकाका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला. |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. स्वमत (3)
पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर आवश्यक आहे. याबाबत तुमचे काय मत आहे.
उत्तर
१.
- पोरांना बसने प्रवास करणे आवडत नाही, कारण यात पोरांना कमीपणा वाटतो.
- आपल्याला झाडं लावावी लागतील, कारण त्या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील.
२.
३. बहुतेक वेळा सर्व जण लांब जाणे असो अथवा जवळ जाणे असो. छोट्या-मोठ्या कारणासाठी ये-जा करता स्कूटर किंवा बाईकचा वापर करतात. लांब ठिकाणी जाताना हे योग्य आहे, पण जवळच्या ठिकाणी बाईक वापरणे योग्य नाही. कारण बाईकमधील कार्बन डायऑक्साइड हवेत मिसळून प्रदूषण वाढते आणि सर्वांनी अशा छोट्या कारणासाठी बाईकचा वापर केला तर हे कार्बनचे प्रमाण अधिक वाढत राहणार. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर योग्य आहे. साधारण आकडेवारीप्रमाणे सांगितले तर बसमध्ये चाळीस ते पन्नास व्यक्ती बसतात. या व्यक्तीपैकी तीस व्यक्तींनी बाईकचा वापर थांबविला तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी होईल म्हणून पब्लिक ट्रान्सपोर्ट महत्त्वाचे व योग्य आहे.