Advertisements
Advertisements
प्रश्न
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा:
प्रश्नांची निर्मिती
उत्तर
मुलाखतीत प्रश्नांचे स्वरूप फार महत्त्वाचे असते. मुलाखतीची पूर्वतयारी हा एकप्रकारे मुलाखतीचा गृहपाठ असतो. त्यामुळे मुलाखत त्याची सर्व आवश्यक माहिती मुलाखतकाराला मिळवावी लागते. प्रश्नांच्या साहाय्याने मुलाखतकाराकडून कार्यप्रवास अधिकाधिक जाणून घेता येईल, अशी प्रश्नांची तयारी करणे महत्त्वाचे असते. प्रश्नांची निर्मिती उपलब्ध माहितीच्या आधारे करणे गरजेचे असते. मुलाखतीत विचारायचे प्रश्न पूर्वतयारीत मुलाखतकाराला क्रमवार लिहून काढावे लागतात. प्रश्नांच्या ओघावर मुलाखतीतील संवादाचे प्रवाहीपण अवलंबून असते. मुलाखतीचे हे प्रवाहीपण लक्षात घेऊन प्रश्नांची निर्मिती करणे आवश्यक असते. प्रश्नांचे स्वरूप सहज आकलन होईल असे असावे. चुकीचे, अप्रस्तुत, भावना दुखावणारे, तणाव निर्माण करणारे, विषयाशी असंबद्ध, प्रभावहीन प्रश्न मुलाखतीत नसतील, याची काळजी पूर्वतयारीत घेणे गरजेचे असते. मुलाखतीत प्रश्नांची संख्या लक्षात घ्यावी लागते. प्रश्नांमध्ये वैविध्य असावे. कधीकधी एका प्रश्नातून दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मुलाखत दात्याकडून येऊ शकते. अशा प्रसंगी पर्यायी प्रश्नांची तयारी पूर्वतयारीत ठेवणे महत्त्वाचे असते. पूर्वतयारीत तयार केलेल्या प्रश्नावलीतील प्रश्नांची निवड मुलाखतीत महत्त्वाची असते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीची पूर्वतयारी.
खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीचा समारोप.
व्यक्तीमधील 'माणूस' समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद, हे स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
उमेदवार 'आतून' जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते, सोदाहरण स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:
मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:
मुलाखतदात्याचे कार्य.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा :
मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन.
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
भाजीवाला
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
पोस्टमन
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
परिचारिका.
मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा.
मुलाखत घेताना कराव्या लागणाऱ्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा.
मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती ______ मुलाखत दात्याचे कार्य _____ प्रश्नांची निर्मिती
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीचा समारोप’ स्पष्ट करा.
भाषिक कौशल्ये - परिणामकारक निवेदन - अनपेक्षित समारोप - श्रोत्यांचा प्रतिसाद - मुलाखतीची यशस्विता.
बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील चि. अमित/कु. अमिता घोलप यास/हीस राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यासंदर्भात त्याची/तिची मुलाखत घ्या.
एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, हे खालील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करा.
मुलाखतीचा प्रारंभ ______ मुलाखतदात्याचे कार्य ______ मुलाखतीचा मध्य ______ प्रश्नांची लवचीकता ______ मुलाखत समारोप.