Advertisements
Advertisements
प्रश्न
नालकुंतल म्हणजे काय? त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या.
संक्षेप में उत्तर
उत्तर
विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलांची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल (Solenoid) म्हणतात.
नालकुंतलातून विद्युतधारा वाहत असताना निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रातील बलरेषा पट्टीचुंबकाच्या चुंबकीय बलरेषांप्रमाणेच असतात. नालकुंतलाचे एक टोक दक्षिण ध्रुव म्हणून, तर दुसरे टोक उत्तर ध्रुव म्हणून कार्य करते. नालकुंतलाच्या आतील भागातील चुंबकीय क्षेत्र एकसमान असते.
नालकुंतलातून विद्युतधारा गेल्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकीय बलरेषा
B: बॅटरी, K : प्लगकळ, I : विद्युतधारा,
N: उत्तर ध्रुव, S : दक्षिण ध्रुव
पट्टीचुंबकाभोवती असणाऱ्या चुंबकीय बलरेषा
shaalaa.com
नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र (Magnetic field due to a current in a solenoid)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?