Advertisements
Advertisements
प्रश्न
पाऊस पडलाच नाही, तर..... कल्पना करा. खालील मुद्द्यांच्या आधारे निबंधलेखन करा.
- पाण्याचा दुष्काळ.
- दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम.
- शेती व उद्योगधंदे यांच्यावर होणारा परिणाम.
- नदी, नाले, विहिरींची स्थिती.
- सजीवांवर होणारा परिणाम.
उत्तर
पाऊस पडलाच नाही, तर.....
पाऊस पडलाच नाही तर त्या प्रदेशात सर्वत्र पाण्याचा दुष्काळ पडेल. प्रत्येक माणूस चिंताग्रस्त होईल. काही माणसे तर शेतीवाडी सोडून स्थलांतर करतील. पाणी नाही आणि त्यामुळे धान्यही नाही असा प्रचंड सुका दुष्काळ जीवन असह्य करून सोडील.
हॉटेलात पाणी फुकट मिळणार नाही. पाण्याच्या बाटल्यांची किंमत अतोनात वाढेल. प्यायलाच पाणी नाही तेथे अंघोळ कुठून? आदी थोडेसेच पाणी पिऊन तहान भागवावी लागेल, कपडे धुणेही जवळजवळ बंद होईल. ‘खायला देतो पण पाणी मिळणार नाही’ अशी परिस्थिती निर्माण होईल. गुरे ढोरे तर पाण्यावाचून तडफडून मरतील. नळातूनही पाणी फार कमी येईल. पाण्यासाठी भांडणे होतील. शेती तर निव्वळ पाण्यावर अवलंबून असते. पाण्याचे पंप असतील पण पाणीच नसेल. मग शेतकरी पेरणी कसे करणार? शेतात धान्य कसे उगवणार. नदीचे, तलावाचे पाणी शेतीकरिता वापरता येते. पण नदी, नाले, तलाव, विहिरी सारे कोरडे पडलेले असणार. पाण्याविना उद्योगधंदेही ठप्प पडतील. नद्या, नाले सुकून जाणार, त्यांचे नुसते वाळवंट होईल. तलाव, आटून जातील. फारच भयावह गंभीर परिस्थिती निर्माण होईल. विहिरीही कित्येक गाई, म्हशी, वासरे, बैल आणि अन्य प्राणीही पाण्याविना तडफडून मरतील. वाघ, अस्वल, सिंह इत्यादी श्वापदांनाही पाणी लागते. पाखरेही चिवचिवाट करतील.आणि अखेर संपून जातील. गावेची गावे ओस पडतील. रुग्णांचे तर हाल विचारायलाच नकोत. ‘पाणी, पाणी’ करत सर्व जीव व्याकूळ होऊन जातील. मृत्यूला टेकलेल्या माणसालाही शेवटी पाणी पाजायचे असते.
पाऊस पडला नाही, तर पहिल्या पावसात येणारा मातीचा सुगंध येणार नाही. इंद्रधनुष्य दिसणार नाही. हिरवेगार रान दिसणार नाही. पाऊस नसेल तर डोंगरावर कोसळणारे धबधबे नसतील. सुसाट वाहणारी नदी नसेल. जीवनातील सारे चैतन्यच हरवून जाईल.