Advertisements
Advertisements
प्रश्न
पाठात शोधून लिहा.
महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे?
दीर्घउत्तर
उत्तर
ताराबाईंच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना 'शिवभारत'कार परमानंदाचा मुलगा कवी देवदत्त याने म्हटले आहे,
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।
दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रयत्नाची वेळ आली। मुगल हो सांभाळा॥
"राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली. त्यामुळे दिल्लीच्या पातशाहाची-औरंगजेबाची अवस्था दीनवाणी झाली, त्याचे तेज हरपले. भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले; म्हणून मुघलांनो, आता स्वतःला सांभाळा!"
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?