Advertisements
Advertisements
प्रश्न
पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे, याविषयी पालकांसोबत चर्चा करा.
लघु उत्तरीय
उत्तर
पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पक्ष्यांच्या सहवासामुळे निसर्गाची सुंदरता वाढते. पक्षी आपल्या चोचीत झाडांच्या बिया एका ठिकाणाहून दुसरीकडे नेतात त्यामुळे वृक्षवाढीस हातभार लागतो. बीजप्रसारात पक्ष्यांची प्रमुख भूमिका असते. भारतात सुमारे पक्ष्यांच्या १२०० जाती असून स्थानिक तसेच, स्थलांतरित जातींची संख्याही पुष्कळ आहे. पक्षी शेतातील किडे खाऊन शेतीचे नुकसान होण्यापासूनही वाचवतात. काही पक्षी पर्यावरणातील मृत गोष्टी खाऊन पर्यावरणाला दूषित होण्यापासून वाचवतात. अशाप्रकारे, पर्यावरण संतुलन राखण्यातील पक्षी हा अविभाज्य घटक ठरतो.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?