Advertisements
Advertisements
प्रश्न
'पंख असते तर एकदम उडून गेलो असतो' यामागील श्यामची कल्पना काय असावी, याबाबत मित्रांशी चर्चा करा.
लघु उत्तरीय
उत्तर
पंख ही पक्ष्यांना मिळालेली देणगीच असते. त्यांच्या मदतीने पक्ष्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाता येते. 'श्यामचे बंधुप्रेम' या पाठात लहान भावाला दिवाळीला नवा कोट नेऊन देण्यासाठी श्यामची धडपड चालली होती. शिक्षणाकरता बाहेर राहणाऱ्या श्यामला लवकरात लवकर घरी पोहोचून आपल्या भावाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा होता; मात्र मुसळधार पाऊस, त्यामुळे नदी-नाल्यांना आलेला पूर असे असंख्य अडथळे श्यामसमोर उभे होते. अशा अवस्थेतही आईला आपल्या या कृतीने किती आनंद होईल या विचाराने, घरच्या ओढीने तो चालत होता. त्यावेळी 'पंख असते, तर एकदम उडून गेलो असतो' आणि अंतर केव्हाच पार करत मी घरी पोहोचलो असतो असा विचार श्यामने केला असावा.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?