Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔPQR मध्ये; PQ = `sqrt8`, QR = `sqrt5`, PR = `sqrt3`; तर ΔPQR हा काटकोन त्रिकोण आहे का? असल्यास त्याचा कोणता कोन काटकोन आहे?
उत्तर
ΔPQR ची मोठी बाजू = PQ = `sqrt8`
∴ PQ2 = `(sqrt8)^2` = 8
आता, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज,
QR2 + PR2 = `(sqrt5)^2` + `(sqrt3)^2` = 5 + 3 = 8
∴ PQ2 = QR2 + PR2
∴ सर्वांत मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा आहे.
∴ PQR हा काटकोन त्रिकोण आहे. .....[पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास]
आता, PQ हा ΔPRQ चा कर्ण आहे
∴ ∠PRQ = 90° .....[कर्णासमोरील कोन]
∴ ΔPQR हा काटकोन त्रिकोण असून ∠PRQ हा त्याचा काटकोन आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
7 सेमी, 24 सेमी, 25 सेमी बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का? सकारण लिहा.
एका त्रिकोणाच्या बाजू 50 सेमी, 14 सेमी आणि 48 सेमी आहेत, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते सांगा.
एका त्रिकोणाच्या बाजू 8 सेमी, 15 सेमी आणि 17 सेमी आहेत, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते सांगा.