Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक
उत्तर
प्रादेशिक विकासाचा एकच एक मापदंड नाही. एखादया क्षेत्राचा विकास करण्यासाठी एकमेव मापदंड वापरता येणार नाही. प्रादेशिक विकासावर प्रामुख्याने प्राकृतिक घटक, लोकसंख्याविषयक घटक, भूमी उपयोजन आणि तेथे केल्या जाणाऱ्या आर्थिक क्रिया या चार प्रमुख घटकांचा मोठा प्रभाव पडतो.
$प्रदेशाचे स्थान, हवामान, प्राकृतिक रचना, उंची, मृदा, पाण्याची उपलब्धता, समुद्राचे सान्निध्य, नैसर्गिक बंदरांची शक्यता असे विविध प्राकृतिक घटक प्रदेशाच्या विकासावर परिणाम करतात.
लोकसंख्या, लोकसंख्या घनता व रचना, जन्म-मृत्युदराचे प्रमाण, व्यवसाय रचना, प्रजनन क्षमता, जीवनमान, आयुष्मान, क्रयशक्ती, दारिद्र्याचे प्रमाण, शिक्षणाचे प्रमाण असे लोकसंख्याविषयक गुणात्मक घटक प्रदेशाच्या विकासावर परिणाम करतात.
भूमी उपयोजन ही एक सतत बदलणारी प्रक्रिया आहे. आर्थिक विकास जसा वाढत जातो, तसतसे प्रदेशातील भूमि उपयोजनाचे स्वरूपही बदलत जाते. ग्रामीण भागात शेती क्षेत्राखालील जमीन जास्त असते, तर नागरी भागात निवासी क्षेत्र, व्यवसाय, वाहतूक उद्योग यांसाठी जमीन जास्त प्रमाणात वापरली जाते.
ज्या प्रदेशात प्राथमिक व्यवसायांचे प्रमाण जास्त असते व सर्वाधिक लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेली असते, असा प्रदेश विकासात मागे असतो. मात्र जसजशी विकासाची पातळी उंचावत जाते, तसतसे लोकसंख्येचे आणि व्यवसायांचे स्थित्यंतर होते आणि प्रदेशातील तृतीयक व्यवसायांचे स्वरूप बदलत जाते तसेच तृतीयक व्यवसायात कार्यरत लोकसंख्येचे प्रमाणही वाढत जाते.
अशाप्रकारे प्रादेशिक विकासावर विविध घटक परिणाम करतात.