Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रबोधनकाळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती लिहा.
उत्तर
(अ) प्रबोधनकाळातील विज्ञानाचा विकास :
(१) प्रबोधनकाळात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणी यांना चालना मिळाली.
(२) मानवी बुद्धीला आणि प्रतिभेला नवी दिशा मिळून विश्वाची रहस्ये वैज्ञानिक पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न होऊ लागला.
(३) वैज्ञानिक प्रयोगांद्वारे स्थलकालातीत असे वैज्ञानिक सिद्धांत, नियम सूत्रबद्ध पद्धतीने मांडले जाऊ लागले.
(४) नवी वैज्ञानिक परिभाषा तयार होऊ लागली.
(५) विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात अनेक संस्था, नियतकालिके सुरू होऊन वैचारिक देवाणघेवाण सुरू झाली. या सर्वांतून युरोपात प्रबोधनकाळात विज्ञानाचा विकास झाला.
(ब) वैज्ञानिक शोध :
(१) प्रबोधनकाळात होकायंत्र, सूक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक यंत्र, भारमापक यंत्र यांचा शोध लागला.
(२) सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्मजंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले.
(३) रॉबर्ट बॉईल याने वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते, हे शोधून काढले.
(४) हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या वायूंसंदर्भात संशोधन सुरू झाले.
(५) भौतिकशास्त्रात उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले.
(६) प्राणिशास्त्रामध्ये प्राण्यांची वर्गवारी केली गेली.