हिंदी

पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. वैशिष्ट्ये लिहा: i कृष्णा नदीचा प्रवाह → ______ ii. टोपलीत ठेवलेले मूल → ______ - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.

१. वैशिष्ट्ये लिहा: (२)

  1. कृष्णा नदीचा प्रवाह → ______
  2. टोपलीत ठेवलेले मूल → ______
  3. लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल → ______
  4. कविवर्य नारायण सुर्वे यांचे कार्यक्रम → ______

पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती. 

कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’

२. प्रत्येकी एका वाक्यांत उत्तरे लिहा: (२)

  1. सन्मानाची प्रतीके लिहा.
  2. पाचपन्‍नास रुपयांच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला का दिल्या असाव्यात?

३. व्याकरण: 

(i) गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा: (१)

(अ) ठेवणे, गुंडाळणे, शहाणे, गाजणे → ______

(ब) शाल, कृष्णा, पर्वत, नदी → ______

(ii) अनेकवचन लिहा: (१)

(अ) टोपली - ______

(ब) मासा - ______

४. स्वमत: (२)

लेखक - रा. ग. जाधव यांची संवेदनशीलता जाणवणारे कोणतेही एक 'उदाहरण पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

आकलन

उत्तर

१.

  1. कृष्णा नदीचा प्रवाह → चिंचोळा
  2. टोपलीत ठेवलेले मूल → छोटे मूल
  3. लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल → पुलकित
  4. कविवर्य नारायण सुर्वे यांचे कार्यक्रम → सभा व संमेलने

२.

  1. शाल व श्रीफळ ही सन्मानाची प्रतीके आहेत.
  2. कारण ती बाई गरीब होती व तिच्या बाळासाठी दूध व खाऊ घ्यावा या उद्देशाने पाचपन्‍नास रुपयाच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला दिल्या.

३. (i)

(अ) शहाणे

(ब) पर्वत

(ii) (अ) टोपली - टोपल्या

(ब) मासा - मासे

४. लेखकाला ओंकारेश्वर मंदिराच्या पूलावर फिरायला जाण्याची सवय होती. असेच एकदा कडक थंडीच्या दिवसात लेखक फिरायला गेले होते तेव्हा त्यांना तेथे एक अशक्त म्हातारा भिक्षेकरी दिसला त्याकडे नीट अंथरूण-पांघरूण नाही असे लेखकाला दिसले. लेखकाने दुसऱ्या दिवशी दोन शाली त्या म्हाताऱ्या भिक्षेकरी माणसास दिल्‍या. लेखकाला वाटेल आपल्याकडे अशा शाली पड़ून आहेत. त्या भिक्षेकरी माणसास त्याचा चांगला उपयोग होईल. त्याचे थंडीपासून रक्षण होईल. यातून लेखकाची संवेदनशील वृत्ती दिसून येते.

shaalaa.com
शाल
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2018-2019 (March) Set 1

संबंधित प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्या वर मी निघण्याच्या बेतात होतो; तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, ‘‘तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?’’
मी एका पायावर ‘हो’ म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दि ली. वापरली मात्र कधीच नाही.
पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षि णेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या . थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्या च्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ याघटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.
कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्य क्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्य क्रमात सन्मा नाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’

(१) कोण ते लिहा.     ०२

  1. सभा, संमेलने गाजवणारे कवी -
  2. विश्वकोशाचे अध्यक्ष  नात्याने वाईला जाणारे -
  3. लेखकाचा शाल देऊन गौरव करणारे -
  4. मासे पकडण्याचा उद्योग करणारी -

(२) का ते लिहा.   ०२

  1. बाळ रडत होते कारण....
  2. लेखकाने सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली कारण....

(३) खालील शब्दासाठी उताऱ्यात आलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधून लिहा.     ०२

  1. वर × ______
  2. उद्धट × ______
  3. ओहोटी × ______
  4. कमी × ______

(४) स्वमत - ‘‘शाल व शालीनता  पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. ०२


पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख - ______


उत्तरे लिहा.

पाठात उल्लेख असणारी नदी - ______


उत्तरे लिहा.

सभासंमेलने गाजवणारे कवी - ______


शालीचे शाल या पाठात आलेले विविध उपयोग लिहा.


खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.

एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.


खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.

म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले.


कारणे शोधून लिहा.

एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण ___


कारणे शोधून लिहा.

शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण ___


कारणे शोधून लिहा.

लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण ______


खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.

बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या.


खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.

खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते!


‘शाल व शालीनता’ या पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.


‘भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.


लेखकाच्या भावना जशा ‘शाल’ या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×