हिंदी

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. १) आकृतिबंध पूर्ण करा. (२) वस्तूंना या गोष्टी नकोत- ______ वस्तूना याची हमी हवी- ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृतिबंध पूर्ण करा.  (२)

  1. वस्तूंना या गोष्टी नकोत- ______
  2. वस्तूना याची हमी हवी- ______

२) उत्तरे लिहा.  (२)

वस्तूंना असे ठेवावे.

  1. ____________
  2. ____________
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना.
वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते,
त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची,
हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
नंतरच्या काळातही.
आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा.

३) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा.  (२)

वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह

४) काव्यसाैंदर्य लिहा.   (२)

कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा

संक्षेप में उत्तर

उत्तर

१) 

  1. वस्तूंना या गोष्टी नकोत- वेगळी, स्वतंत्र खोली
  2. वस्तूना याची हमी हवी- निष्कासित न होण्याची

२) वस्तूंना असे ठेवावे.

  1. वस्तूंना जपावे.
  2. लाडावून ठेवावे.

३) वस्तूंना अगदी आपुलकीने जपावे, त्यांना लाडावूनही ठेवावे कारण याच वस्तू आपण या आयुष्यातून निघून गेल्यावरही आपल्या आठवणी, स्नेह जिवंत ठेवणार आहेत.

४) 'वस्तू' या कवितेतून कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंचे आपल्या आयुष्यातील मोल जाणावे आणि त्यांच्याशी असलेले भावनिक बंध व त्यांच्याशी निगडित स्नेह जपावा असा संदेश दिला आहे.
जरी वस्तूंना मानवी भावना नसल्या, तरीही त्यांना मानाने, लाडाने वागवावे, जपावे व त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता बाळगावी असे कवी म्हणतात. एखादी वस्तू वापरण्यास अयोग्य झाली, की तिला घराबाहेर काढले जाते; पण वर्षानुवर्षे आपल्या घरात राहिलेल्या या वस्तूंना कृतज्ञतेने निरोप देण्याचा त्यांचा हक्क आपण जपला पाहिजे, असा संदेश प्रस्तुत ओळींतून व्यक्त होतो.

shaalaa.com
वस्तू
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: वस्तू - कृती क्रमांक २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
अध्याय 6 वस्तू
कृती क्रमांक २ | Q 2. (अ)

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.


कारणे लिहा.

वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण ______ 


कारणे लिहा.

वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण ______ 


कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा.

वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.


‘वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची’ याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.


एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली, याचे वर्णन करा.


तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा.


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृतिबंध पूर्ण करा.  (२)

i. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी-

  1. ____________
  2. ____________

२) मानव व वस्तू यांच्यातील समान भावना -  (2)

मानव  
वस्तू  
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना.
वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते,
त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची,
हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
नंतरच्या काळातही. 
आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा.

३) कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा.  (२)

त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.

४) काव्यसाैंदर्य लिहा. (२)

वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबत तुमचा दृष्टिकोन सांगा. 


पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

वस्तू

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.  (1)
  2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा.  (2)

पुढील ओळींचे रसग्रहण करा. 

वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.


पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

वस्तू

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
  3. दोन शब्दांचे अर्थ (२)
    अ) डचमळणे -
    ब) रणशिंग -

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

क्र. मुद्दे वस्तू
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
2. कवितेचा विषय -  
3. शब्दांचे अर्थ लिहा. i. स्नेह - ______
ii. निखालस - ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×