Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
आर.एन.ए. ची रचना, कार्य व प्रकार स्पष्ट करा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
आर.एन.ए. हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्युक्लीक आम्ल होय. हे आम्ल रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानीन, सायटोसीन ॲडेनीन व युरॅसिल या चार नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. रायबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयुगातून न्युक्लीक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच न्युक्लीओटाइड तयार होते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून आर.एन.ए
- रायबोझोमल आर. एन. ए. (rRNA): रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आर.एन.ए. चा रेणू होय. रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचे काम करतात
- मेसेंजर आर. एन. ए. (mRNA): पेशीकेंद्रामध्ये असलेल्या जनुकांमधील अर्थात डी.एन.ए. च्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोमपर्यंत नेणारा ‘दूत रेणू’.
- ट्रान्सफर आर. एन. ए. (tRNA): mRNA वरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोमपर्यंत आणणारा आर.एन.ए.चा रेणू.
आर.एन.ए प्रकार
shaalaa.com
रायबोन्यूक्लिइक आम्ल (आर.एन.ए.)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?