Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दात लिहा.
गुणसूत्रांचे प्रकार स्पष्ट करा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
गुणसूत्रांचे प्रकार पेशी विभाजनाच्या वेळी स्पष्टपणे दिसतात.
- मध्यकेंद्री: या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्यावर असतो व हे ‘V’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्र भुजा समान लांबीच्या असतात.
मध्यकेंद्री - उपमध्यकेंद्री: या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे ‘L’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभूजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते.
उपमध्यकेंद्री - अग्रकेंद्री: या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाजवळ असतो. व हे ‘j’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असते.
अग्रकेंद्री - अंत्यकेंद्री: या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाला असतो व हे ‘i’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एकच गुणसूत्र भूजा असते.
अंत्यकेंद्री
सामान्यत: कायिक पेशीत गुणसूत्रांच्या जोड्या असतात. या जोडीतील गुणसुत्रे आकार व रचनेने सारखी असल्यास त्यांना समजातीय गुणसूत्रे (Homologous Chromsomes) म्हणतात तर आकार व रचनेने सारखी नसल्यास त्यांस विजातीय गुणसूत्रे (Heterologous Chromosomes) म्हणतात. लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांत गुणसूत्रांची एक जोडी अन्य जोड्यांपेक्षा वेगळी असते. या जोडीतील गुणसूत्रांना लिंग गुणसूत्रे व अन्य गुणसूत्रांना अलिंगी गुणसूत्रे म्हणतात.
shaalaa.com
गुणसूत्रांचे प्रकार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?