Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
उत्तर १
- 'बखर' हा एक ऐतिहासिक साहित्य प्रकार असून यात शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयींचे वर्णन केलेले आढळते.
- बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंगवर्णनपर, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक व राजनीतिपर असे प्रकार असून यातून आपल्याला राजे-महाराजे यांच्या कार्याबद्दल माहिती मिळते.
- उदा. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीविषयक 'सभासद बखर', पानिपतच्या युद्धाविषयीची 'भाऊसाहेबांची बखर', तसेच होळकरांचे घराणे व त्यांच्या योगदानाची माहिती देणारी 'होळकरांची कैफियत' ही बखर. यावरून राजांची चरित्रे व त्यांची कारकीर्द यांच्या अभ्यासासाठी बखर हा महत्त्वाचा संदर्भ असल्याने तो ऐतिहासिक साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे असे म्हणता येते.
उत्तर २
- ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र-शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो.
- बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. तसेच थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील घरांची वर्णन असतात.
- तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून 'बखर' हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ______ हे होते.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
राजतरंगिणी हा ग्रंथ शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाच्या आधुनिक संकल्पनेशी जवळचे नाते सांगतो.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखले जाते.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
सोहगौडा ताम्रपट हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा, असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्रह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीला जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते. |
१. सोहगौडा ताम्रपट कोणत्या राज्यात सापडला?
२. सोहगौडा ताम्रपटावर आढळणारी चिन्हे आणखी कोठे आढळतात?
३. सोहगौडा ताम्रपटाद्वारे कोणता इतिहास समजतो?
प्राचीन भारतीय इतिहास लेखनाचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्या.
१. मौखिक परंपरा
२. कोरीव लेख
३. लिखित साहित्य
बखर म्हणजे काय?
बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा: