Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
टिप्पणी लिखिए
उत्तर १
- प्रसारमाध्यमांद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते.
- ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते.
प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह, दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात. - जर्मनीतील 'स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिश्या प्रसिद्ध केल्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले. म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
shaalaa.com
उत्तर २
१. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते. वर्तमानपत्रातून येणाऱ्या निरनिराळ्या बातम्या, लेख आणि सदरांमधून तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेता येतो.
२. मात्र, प्रत्येक वेळी वर्तमानपत्रांमधून आपणासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असतेच असे नाही. उदा. 'स्टर्न' नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. या रोजनिशींची बातमी प्रसिद्ध झाली; परंतु नंतर त्या नकली असल्याचे सिद्ध झाले.
म्हणूनच, याकरता प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते.
shaalaa.com
प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?