Advertisements
Advertisements
प्रश्न
रोजनिशी का लिहावी? रोजनिशी लिहिल्याने काय फायदा होईल, असे तुम्हांला वाटते?
दीर्घउत्तर
उत्तर
रोजनिशी लिहिल्याने जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. रोजनिशीमध्ये आपण आपल्या रोजच्या घडामोडी, आपले विचार, भावना मांडतो. त्यामुळे मन मोकळे होते. आपण आपली रोजनिशी पुन्हा पुन्हा वाचू शकतो. त्यामुळे, घडलेल्या घटना, त्यावरील आपली कृती व विचार यांचा पुन्हा एकदा विचार करता येतो. यामुळे, आपल्याला स्वत:च्या चुका, दोष जाणून घेण्यासही मदत होते. महत्त्वाच्या घटना, तपशील यांची नोंद ठेवण्याची सवय लागते. आपल्या लेखनशैलीमध्ये सुधारणा होत जाते, नेमकेपणाने लिहिण्याची सवय लागते.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?