Advertisements
Advertisements
प्रश्न
स्फटिकजल म्हणजे काय ते सांगून स्फटिकजल असणारे क्षार व त्याचे उपयोग लिहा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
स्फटिकरचनेत पाण्याच्या रेणूंची संख्या निश्चित असते. यालाच स्फटिकजल म्हणतात.
- तुरटी (Potash Alum - K2SO4.Al2(SO4)3.24H2O)
- बोरॅक्स (Borax - Na2B4O7.10H2O)
- ईप्सम सॉल्ट (Magnesium Sulphate - MgSO4.7H2O)
- बेरिअम क्लोराइड (Barium Chloride - BaCl2.2H2O)
- सोडिअम सल्फेट (Sodium Sulphate - Glauber's Salt Na2SO4.10H2O)
- मोरचूद (Copper Sulphate - CuSO4.5H2O)
उपयोग:
- तुरटी: तुरटी व तुरटीची लाही औषधात वापरतात. कागद उदघोगात कागदाला चकाकी देण्यासाठी तुरटी वापरतात.
जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. तुरटीचा वापर पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत केला जातो. - बोरॅक्स: सौंदर्य-प्रसाधन उदघोगात लोशन्स, शाम्पू, कोल्ड क्रीम बनवण्यासाठी बोरॅक्सचा वापर करतात. लॉन्ड्रीमध्ये कपड्यांवरील डाग काढण्यासाठी याचा वापर होतो. प्रयोग-शाळेत बोरॅक्स बीड टेस्टच्या साहाय्याने रंगीत क्षारामधील मूलद्रव्ये शोधण्याकरिता याचा वापर करतात.
- ईप्सम सॉल्ट: याचा उपयोग खते तयार करण्यासाठी तसेच झाडे व भाज्या यांचा हिरवा रंग वाढवण्यासाठी करतात. रेचक औषधे बनवण्याकरिता याचा उपयोग करतात. याचा उपयोग बॉडीस्क्रब म्हणून शरीर घासण्यासाठी करतात. स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी हे आंघोळीच्या पाण्यात (Salt bath) मिसळले जाते.
- बेरिअम क्लोराइड: याचा उपयोग ब्राइनच्या (NaCl चे द्रावण) शुद्धीकरण करण्यासाठी करतात. वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर इलाज करण्यासाठी, कागद उद्घोगात, डाय इंडस्ट्रीमध्ये, सिरॅमक्स तेल शुद्धीकरण, कीटकनाशक औषधांमध्ये याचा उपयोग करतात.
- सोडिअम सल्फेट: याचा उपयोग अपमार्जके तयार करण्यासाठी
करतात. याचा वापर कागद उद्योगात कागदाचा लगदा तयार करण्यासाठी केला जातो आणि डाय इंडस्ट्रीमध्ये देखील वापरला जातो. सौम्य रेचक औषधे बनवण्याकरिता याचा उपयोग करतात. - मोरचूद: ॲनिमियाचे निदान करण्यासाठी रक्त चाचणीमध्ये मोरचूदचा वापर केला जातो. फळांवर बुरशीनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या बोर्डो मिश्रणात मोरचुदाबरोबर चुना वापरतात.
shaalaa.com
काही स्फटिकी क्षार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?