Advertisements
Advertisements
प्रश्न
शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्कम वृत्तालेखात दाखवली आहे. जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 रुपये असेल, तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- खेळावर एकूण किती रक्कम खर्च केली?
- क्रिकेटवर किती रक्कम खर्च केली?
उत्तर
दिलेले: फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 रुपये
a. खेळावर खर्च केलेली एकूण रक्कम x आहे.
केंद्रीय कोनाचे माप = 360°
फुटबॉल खेळासाठी केलेल्या खर्चाचा केंद्रीय कोन 45° आहे.
फुटबॉल खेळांवर खर्च केलेल्या रकमेचा केंद्रीय कोन = `"फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम "/"एकूण खर्च " xx 360°`
∴ 45° = `9000/x xx 360°`
∴ `x = 9000/(45°) xx 360°`
∴ x = 72000
खेळावर खर्च केलेली एकूण रक्कम 72,000 आहे.
b. क्रिकेटवर खर्च केलेली रक्कम x आहे.
क्रिकेट खेळावर झालेल्या खर्चासाठी केंद्रीय कोन 160° आहे.
क्रिकेट खेळासाठी केंद्रीय कोन = `"क्रिकेटवरील खर्च"/"एकूण खर्च" xx 360°`
∴ `160° = x/72000 xx 360°`
∴ `(160° xx 72000)/(360°) = x`
∴ x = 32000
∴ क्रिकेटवर खर्च होणारी रक्कम 32,000 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख सोबतच्या आकृतीमध्ये दिला आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- एकूण व्यावसायिकांची संख्या 10,000 असल्यास बांधकाम क्षेत्रात किती व्यावसायिक आहेत?
- प्रशासन क्षेत्रात किती व्यावसायिक कार्यरत आहेत?
- उत्पादन क्षेत्रात किती टक्के व्यावसायिक आहेत?
एका कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा वृत्तालेख सोबतच्या आकृतीत दिला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- शेअरमध्ये गुंतवलेली रक्कम ₹ 2000 असल्यास एकूण गुंतवणूक किती?
- बँकेतील ठेवींची रक्कम किती?
- म्युच्युअल फंडापेक्षा स्थावर मालमत्तेत किती रक्कम जास्त गुंतवली?
- पोस्टातील गुंतवणूक किती?
सकाळी 8 ते 10 या वेळेत शहरातील एका चौकातील सिग्नलवरून पुढे जाणाऱ्या विविध वाहनांच्या संख्यांची शतमाने खालील वृत्तालेखात दिली आहेत.
- प्रत्येक प्रकारच्या वाहनासाठीच्या केंद्रीय कोनाचे माप काढा.
- दुचाकींची संख्या 1200 असल्यास वाहनांची एकूण संख्या किती?
एका सर्वेक्षणातील शालेय विद्यार्थ्यांची विविध खेळांतील आवड जाणण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात मिळालेली माहिती शेजारील वृत्तालेखात दाखवली आहे. एकूण विद्यार्थी संख्या 1000 असल्यास,
- क्रिकेट आवडणारे विद्यार्थी किती?
- फुटबॉल हा खेळ किती विद्यार्थ्यांना आवडतो?
- अन्य खेळांना पसंती देणारे विद्यार्थी किती?