Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.
उत्तर
- नेत्र, हृदय, फुप्फुसे, स्वादुपिंड, यकृत, हाडे, मूत्रपिंडे व त्वचा यांसारखे अवयव मानवाला निरोगी राखण्यात व त्याच्या शरीरांतर्गत घडामोडी पार पडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर हे मौल्यवान अवयव निकामी झाले किंवा शरीरातून काढून टाकले, तर माणूस सुरळीत जीवन जगू शकणार नाही.
- या अवयवांचे दान केल्यास एखाद्या गरजू माणसाचे आयुष्य सुसह्य होऊ शकते.
- वाढते वयोमान, अपघात, रोग, व्याधी इत्यादी कारणांमुळे ज्यांचे अवयव निकामी झालेले आहेत, अशा व्यक्तींना आपण मूत्रपिंड, त्वचा आदि ठरावीक अवयव दान करू शकतो.
- मरणोत्तरही यकृत, हृदय, डोळे यांसारख्या अवयवांचे दान करता येते.
म्हणूनच, मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल असतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
_______ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.
रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा.
सजीवांच्या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो; त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात या पेशींना __________ म्हणतात.
__________ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय.
मूलपेशी जतन करण्यासाठी त्या _____________ मध्ये ठेवल्या जातात.
वेगळा घटक ओळखा.
भ्रूणातील मूलपेशींपासून मानवी शरीरात तयार होणाऱ्या पेशींची संख्या.
शास्त्रीय कारणे लिहा.
मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यांसारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत.
मरणोत्तर ______ या मानवी अवयवाचे दान करता येते.
अ. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे?
ब. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा.
क. या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते?