Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
प्रयोगशाळेत संहत सल्फ्यूरिक आम्लापासून विरल आम्ल तयार करताना पाण्यामध्ये संहत सल्फ्युरिक आम्ल संथ धारेने सोडून द्रावण काचकांडीने हलवीत राहतात.
उत्तर
(१) विरल सल्फ्युरिक आम्ल तयार करण्याची प्रक्रिया ही अतिउष्मादायी अभिक्रियेत मोडते.
(२) विरल सल्फ्युरिक आम्ल तयार करताना सर्वप्रथम काचेच्या भांड्यात मोठ्या प्रमाणात पाणी घ्यावे व ते काचेचे भांडे बर्फाच्या सान्निध्यात ठेवून वीस मिनिटे थंड करावे. नंतर हळूहळू संहत सल्फ्युरिक आम्ल संथ धारेने सोडावे व द्रावण काचकांडीने हलवत राहावे. सल्फ्युरिक आम्ल पाण्याच्या संपर्कात आल्यावर उष्मादायी अभिक्रिया होते, म्हणजेच उष्णता बाहेर फेकली जाते. अशा रितीने विरल सल्फ्युरिक आम्ल तयार होते.
मात्र याउलट पाणी सल्फ्युरिक आम्लात टाकल्यास द्रावण उकळायला सुरुवात होते. यात फार मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते व सल्फ्युरिक आम्लाचे शिंतोडे काचेच्या भांड्याच्या बाहेर उडतात. यामुळे आपल्या चेहऱ्याला, हाताला किंवा कातडीला मोठ्या प्रमाणात इजा होण्याची शक्यता असते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.
फेरस सल्फेटचे फेरिक सल्पेटमध्ये रूपांतर ही एक ______ अभिक्रिया आहे.
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.
आम्लयुक्त पाण्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे ______ होते.
दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा.
BaCl2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 जलीय द्रावण मिसळणे हे ______ अभिक्रियेचे उदाहरण आहे.
हायड्रोजन पेरॉक्साइडचे अपघटन ह्या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढविता येतो?
ऑक्सीजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहा.
अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा.
शास्त्रीय कारणे लिहा.
शहाबादी फरशीचे तुकडे HCl मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागते पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो.
शास्त्रीय कारणे लिहा.
खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते.
पुढील तक्ता जुळवा.
अभिकारके | उत्पादिते | रासायनिक अभिक्रियेचा प्रकार |
BaCl2(aq) + ZnSO4(aq) | H2CO3(aq) | विस्थापन |
2AgCl(s) | FeSO4(aq) + Cu(s) | संयोग |
CuSO4(aq) + Fe(s) | BaSO4 ↓+ ZnCl2(aq) | अपघटन |
H2O(l) + CO2(g) | 2Ag(s) + Cl2(g) | दुहेरी विस्थापन |
पुढील चित्राचे निरीक्षण करा, रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह मांडा.