Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
शहाणंसुरतं राहायचं असेल, तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरआनंदाची सोबत. ही सोबत तुम्हांला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिच्चून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काहीजण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात, त्यादृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात; पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल, तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वत:च्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वत:ला ओळखू शकता, स्वत:शी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकटं असतानाच तुम्हांला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो, दु:ख त्याच्या वाटेला कधीच जात नाही! आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो फक्त वर्तमानकाळ. तोच भरभरून जगायचा असतो. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं. जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल, तर ‘आजचं काम उद्या करू’ असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसंतरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा घेणार? |
(१) सूचनेनुसारपुढील आकृतिबंध पूर्ण करा. (2)
(i)
(ii) आनंद अनुभवण्यासाठी या गोष्टीपासून
मन मुक्त असावं लागत
(२) ‘पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरआनंदाची सोबत' या विधानाचा अर्थ तुमच्या भाषेत लिहा. (2)
(३) स्वमत अभिव्यक्ती- (४)
आनंद मिळविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करता येणे शक्य आहे असे लेखकास वाटले?
वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं या विधानाविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
किंवा
शिवराज गोर्ले ‘आयुष्य-आनंदाचा उत्सव’ या पाठात त्यांनी आनंद हा प्रत्येक अंतरंगात असून तो मिळविण्यासाठी त्याच्यामध्ये आनंदांचे भान जागे असावे लागते. हा विचार व्यक्त केला आहे.
उत्तर
(१) (i)
(ii)
(२) व्यवहारामध्ये शहाणे बनून राहायचे असले तर वाचनाचा छंद असायला पाहिजे कारण पुस्तकाच्या वाचनातून अक्षर आनंद मिळत असतो. ही पुस्तकांची सोबत दगा कधीच देत नाही. या आनंदासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत शिवाय हा आनंद कोणी हिरावूनही घेऊ शकत नाही. माणसं काही वेळा अस्वस्थ झाली की उदास होतात. परमेश्वराचा धावा करतात. परंतु काही जन पुस्तकाचे वाचन करतात. त्यादृष्टीने पुस्तकाला परमेश्वर म्हटले पाहिजे असे लेखकास वाटते कारण मित्रांची कितीही आठवण काढली तरी ते उपलब्ध होत नाहीत. मात्र पुस्तके लगेच उपलब्ध होता त्यादृष्टीने पुस्तकाची सोबत ही कोणत्याही वेळी अक्षर आनंद देणारी सोबत असते.
(३) शिवराज गोर्ले लिखित ‘आयुष्य... आनंदाचा उत्सव’ या पाठात त्यांगी आनंद हा प्रत्येकाच्या अंतरंगात असून तो मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये आनंदाचे भान जागे असावे लागते हा विचार व्यक्त केला आहे. मानवी जीवनामध्ये प्रत्येकालाच आपण आनंदी असावे असे वाटते मात्र त्यांना आनंद म्हणजे काय? हेच समजत नाही तो वास्तविक पाहता आनंद हा प्रत्येक माणसाच्या अंतरंगात असतो तसेच तो इतर गोष्टीतूनही मिळवता येतो. उदाहरण - वाचनाचा छंद असेल तर माणसाला त्यातूनही आनंद मिळतो. पुस्तकाची सोबत ही अक्षर आनंदाची सोबत असते. एखादे वेळी माणूस अस्वस्थ होतो त्यास उदास वाटते तेव्हा तो परमेश्वराचा धावा करतो. मित्र ही सोबतीला असावेत असे वाटते परंतु मित्र वेळीच उपलब्ध होत नाहीत परंतु पुस्तके उपलब्ध होतात. त्यामुळे पुस्तके म्हणजे परमेश्वरच आहे असे येथे लेखकास वाटते.
निसर्गाचे सानिध्य, संगीताची साथ व पुस्तकाची सोबत असेल तर माणूस एकटा कुठेही राहू शकतो कारण एकटे राहण्यातही एक वेगळाच आनंद असतो. एकटेपणात आपल्या अंतरंगात डोकावता येते, स्वतःशी संवादही साधता येतो. एकटेपणात नवनव्या कल्पनाही सूचनात निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचे आविष्कार असून तो एकटेपणाचा आनंद घेतो त्याच्या वाट्याला दु:ख कधीच येत नाही.
आनंद मिळविण्यासाठी आपले मनही मोकळे असावे लागते. भूतकाळाची स्मृती व भविष्याची भीती या दोन्हीपासून मन मुक्त झाले की आनंदाचा आस्वाद घेता येतो कारण भूतकाळ संपलेला असतो तर भविष्यकाळ ही अनिश्चित असतो आणि म्हणून या दोन्हीपासून मन मुक्त होते तेथच खऱ्या अर्थाने आनंद मिळतो. अशाप्रकारे आनंद मिळविण्यासाठी वरील गोष्टी आपणास करता येतील.
किंवा
‘आयुष्य... आनंदाचा उत्सव’ या पाठाचे लेखक शिवराज गोर्ले असून त्यांच्या हा पाठ ‘मजेत जगाव कसं’ या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकातून घेतला. माणसाला आनंद हा हवा असतो पण आनंद म्हणजे काय? तो कसा मिळवावा? हे त्यांना समजत नाही परंतु खरा आनंद हा माणसाच्या बाहेर नसून त्याच्या अंतरंगातच असतो. तो. ओळखण्यासाठी मात्र त्याचे भान असावे लागते हा विचार लेखकाने या पाठातून व्यक्त केला आहे.
एखादे वेळी माणूस हा अस्वस्थ होतो. त्यास उदास वाटू लागते. अशावेळी तो परमेश्वराचा धावा करतो परंतु परमेश्वराच्या रूपात पुस्तके उपलब्ध होतात व त्यातून माणसाला आनंद घेता येतो. ज्ञानात नवनवीन भर पडते. या व्यतिरिक्तही निसर्गाच्या सानिध्यात, संगीतातून तसेच पुस्तक वाचनातून आपण एकटे असलो तरी आनंद घेता येतो. आपल्या अंतरंगात डोकावता येते. स्वतःशी संवाद साधता येतो. एकटेपणात नवनवीन कल्पना सूचनात महत्त्वाचे म्हणजे निर्मिती, शोध आणि साक्षात्कार हे एकटेपणाचे आविष्कार होत. त्यामुळे जो एकटेपणाचा आनंद घेतो त्याच्या वाट्याला दुःख येत नाही.
खरा आनंद मिळविण्यासाठी माणसाचे मन मोकळे असावे लागते. त्याचे मन भूतकाळात गुंतून राहता कामा नये व भविष्यकाळाचाही विचार करू नये कारण भूतकाळ संपलेला असतो तर भविष्यकाळ अनिश्चित असल्याने माणसाने खऱ्या अर्थाने वर्तमानकाळात जगायला शिकले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकालाच जगण्याविषयी प्रेम हवे. जगण्याची हौस असावी. अन्यथा आजचे काम उद्या असे होते. मात्र माणसाने आयुष्य जगत असताना भूतकाळ-भविष्याचा विचार न करता आनंदाने जगायला हवे. कारण खरा असतो तो वर्तमानकाळात त्याचबरोबर कुठलेही काम उरकावाचे म्हणून उरकू नये तर प्रत्येक गोष्टीत आनंद घेतला पाहिजे. ती मनापासून केली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आनंदी जीवन जगता येईल. आपल्या ओवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींचा आनंद घेता येईल आणि स्वतःवर प्रेम करता येईल, त्यासाठी प्रत्येकाच्या मनात जगण्याविषयी प्रेम असणे आवश्यक आहे तरच त्याला वर्तमानातही आनंदाने जगता येईल. हा आशावाद लेखकाने येथे स्पष्ट केला आहे.