Advertisements
Advertisements
प्रश्न
समांतरभुज चौकोनाच्या चारही कोनांच्या दुभाजकांमुळे तयार झालेला चौकोन आयत असतो, हे सिद्ध करा.
उत्तर
पक्ष: `square`ABCD हा समांतरभुज चौकोन आहे.
साध्य: `square`PQRS हा आयत आहे.
सिद्धता:
`square`ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ...(पक्ष)
∠ADC + ∠BCD = 180° ...(समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात.)
दोन्ही बाजूंना `1/2` ने गुणून,
`1/2` ∠ADC + `1/2` ∠BCD = `1/2xx180°` ...(i)
पण,
`1/2` ∠ADC = ∠PDC ...(किरण DP हा ∠ADC चा दुभाजक आहे.) ...(ii)
आणि `1/2` ∠BCD = ∠PCD ...(किरण CP हा ∠BCD चा दुभाजक आहे.) ...(iii)
∴ ∠PDC + ∠PCD = 90° ...[(i), (ii) आणि (iii) वरून] ...(iv)
ΔPDC मध्ये,
∠PDC + ∠PCD + ∠DPC = 180° ...(त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.)
∴ 90° + ∠DPC = 180° ...[(iv) वरून]
∴ ∠DPC = 180° – 90°
∴ ∠DPC = 90°
म्हणजेच ∠SPQ = 90° ...(D-S-P, P-Q-C) ...(v)
याचप्रमाणे, आपण सिद्ध करू शकतो, की ∠SRQ = 90° ...(vi)
तसेच, ∠ASD = 90° आणि ∠BQC = 90° ...(vii)
∠PSR = ∠ASD ...(शिरोबिंदू कोन)
∴ ∠PSR = 90° ...[(vii) वरून] ...(viii)
तसेच, ∠PQR = 90° ...(ix)
`square`PQRS मध्ये,
∠SPQ = ∠SRQ = ∠PSR = ∠PQR = 90° ...[(v), (vi), (viii) आणि (ix) वरून]
∴ `square`PQRS हा आयत आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोणताही आयत समांतरभुज असतो, हे सिद्ध करा.
`square`ABCD या आयताचे कर्ण O मध्ये छेदतात. जर AC = 8 सेमी, तर BO = ? जर ∠CAD = 35° तर ∠ACB = ?
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो.
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो.
एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी व 24 सेमी आहेत तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढा.
आयत PQRS चे कर्ण परस्परांना M बिंदूत छेदतात. जर ∠QMR = 50° तर ∠MPS चे माप काढा.